माहिती आयुक्त देशपांडे यांचा राजीनामा
By Admin | Updated: June 24, 2015 01:39 IST2015-06-24T01:39:13+5:302015-06-24T01:39:13+5:30
निलंबनाची टांगती तलवार असलेले औरंगाबाद विभागाचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविला.

माहिती आयुक्त देशपांडे यांचा राजीनामा
मुंबई : निलंबनाची टांगती तलवार असलेले औरंगाबाद विभागाचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविला.
सार्वजनिक बांधकाम खात्यातून सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर देशपांडे यांची माहिती आयुक्तपदी वर्णी लागली होती. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात आरोपी म्हणून नाव समोर आल्यानंतर देशपांडे यांना बरखास्त करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपालांकडे केली होती. नियमानुसार शासनाचा प्रस्ताव राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मान्यतेसाठी पाठवायचा असतो. एकदा हा प्रस्ताव पाठविला की राज्यपाल माहिती आयुक्तांना निलंबित करू शकतात. ही कार्यवाही सुरू असतानाच देशपांडे यांनी स्वत:हून राजीनामा दिला. देशपांडे १२ जूनपासून रजेवर गेले होते. आज दुपारी त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे पाठविला.