कुख्यात गुंड सादिक बंगाली याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 06:42 IST2016-08-21T06:42:50+5:302016-08-21T06:42:50+5:30

गँगस्टर रवी पुजारी टोळीतील सराईत गुन्हेगार आणि लोणावळा येथील दुहेरी खून प्रकरणातील वाँटेड सादिक बंगाली याला स्वारगेट पोलिसांनी शनिवारी स्वारगेट एसटी बस स्थानकात

The infamous gangster Sadiq Bangali is arrested | कुख्यात गुंड सादिक बंगाली याला अटक

कुख्यात गुंड सादिक बंगाली याला अटक

पुणे : गँगस्टर रवी पुजारी टोळीतील सराईत गुन्हेगार आणि लोणावळा येथील दुहेरी खून प्रकरणातील वाँटेड सादिक बंगाली याला स्वारगेट पोलिसांनी शनिवारी स्वारगेट एसटी बस स्थानकात सापळा रचून पकडले़ त्याच्याकडून एक कार्बाइन, ४ पिस्तुले व एका रिव्हॉल्व्हरसह ६९ काडतुसे जप्त केली आहेत़ फक्त पोलीस, लष्कर यांच्यासाठी खडकी येथील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत उत्पादन करण्यात येणारी काडतुसे बंगालीकडे मिळाली असल्याने एकच खळबळ उडाली आहे़ ही काडतुसे त्याच्याकडे कशी आली, याचा तपास करण्यात येणार असल्याचे सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी सांगितले़
निर्माता-दिग्दर्शक महेश भट यांच्यावर झालेल्या गोळीबारासह जवळपास ९ गुन्हे सादिक बंगाली याच्यावर असून, त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती़

Web Title: The infamous gangster Sadiq Bangali is arrested