उद्योगांना आता आॅनलाइन परवानगी
By Admin | Updated: September 19, 2015 03:29 IST2015-09-19T03:29:39+5:302015-09-19T03:29:39+5:30
राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी विविध विभागाच्या लागणाऱ्या परवानग्या सात दिवसांच्या आत देण्यात याव्यात आणि परवानग्या देण्याची प्रक्रिया आॅनलाइन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र

उद्योगांना आता आॅनलाइन परवानगी
मुंबई : राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी विविध विभागाच्या लागणाऱ्या परवानग्या सात दिवसांच्या आत देण्यात याव्यात आणि परवानग्या देण्याची प्रक्रिया आॅनलाइन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.
मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. उद्योगांसाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात याव्यात. काही विभागांच्या मान्यता मिळण्याची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण न झाल्यास त्या प्राप्त झाल्या आहेत असे समजण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. जास्तीतजास्त उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यासाठी परवाने देण्यासाठीची आॅनलाइन कार्यप्रणाली विभागाने
२ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करावी,
अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी
केली. (विशेष प्रतिनिधी)