ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १- गोरेगाव पूर्वेला कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमधील तळमजल्यावरील एका कापडाच्या गाळयामध्ये भीषण आग भडकली आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
आग नेमकी कशामुळे भडकली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. कामा इंडस्ट्रीयल इस्टेट ही तीन मजली इमारत असून या इमारतीत व्यावसायिक गाळे आहेत.