शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग : जेएनपीटीच्या माथी ४,७१६ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 5:39 AM

देशातील सर्वाधिक कंटेनर हाताळणीचा विक्रम करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्टकडील (जेएनपीटी) तीन हजार कोटींहून अधिक ठेवींवर डोळा ठेवून केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने मनमाड ते इंदूर नव्या रेल्वेमार्गाची बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

ठाणे - देशातील सर्वाधिक कंटेनर हाताळणीचा विक्रम करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्टकडील (जेएनपीटी) तीन हजार कोटींहून अधिक ठेवींवर डोळा ठेवून केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने मनमाड ते इंदूर नव्या रेल्वेमार्गाची बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. जेएनपीटीला भारतीय बंदर रेल्वे महामंडळाचा भागीदार बनवण्यातील ग्यानबाची मेख अशी आहे की, या मार्गासाठी येणारा ४७१६ कोटी १३ लाख ४५ हजारांचा खर्च त्यांना करावा लागणार आहे. डबघाईला आलेल्या एअर इंडियाच्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील इमारतीचा ८०० कोटींचा पांढरा हत्ती पोसण्याचे लोढणे यापूर्वीच वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटीच्या गळ्यात बांधले आहे.देशातील बंदरांना रेल्वेमार्गांशी जोडण्यास केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन इंधन खर्च वाचून रस्ते अपघात आणि प्रदूषणास आळा बसेल, असा केंद्र शासनाचा दावा आहे. मात्र, हे करताना जो खर्च रेल्वेने करायला हवा, तो मुंबई, नवी मुंबई महापालिका, एमएमआरडीए आणि सिडकोवर सोपवला आहे. इंदूर-मनमाड या नव्या ३६२ किमी मार्गाच्या ८५७४ कोटी ७९ लाख खर्चापैकी ५५ टक्के खर्च जेएनपीटीने करावा, असे केंद्र सरकारने ठरवले आहे.मालेगाव येथे लॉजिस्टिक पार्कइंदूर-मनमाड मार्गाचे महत्त्व अधिक वाढवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि अन्य ठिकाणी मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्याचे ठरले आहे.उत्तर आणि मध्य भारताला होणार लाभनव्या इंदूर-मनमाड या मार्गामुळे जेएनपीटीत येणारा माल रेल्वेने थेट अतिजलद गतीने उत्तर आणि मध्य भारतात नेणे सोपे होईल, असा केंद्राचा कयास आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत भारतीय बंदर रेल्वे महामंडळाची स्थापना केली आहे.या महामंडळाद्वारे इंदूर-मनमाड या मार्गाची बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी विशेष हेतू कंपनी स्थापन करून तिच्या माध्यमातून तो पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी जेएनपीटीची निवड करण्यात आली आहे.एकूण प्रकल्पाच्या५५ टक्के हिस्सा जेएनपीटीचाइंदूर-मनमाड मार्गासाठी येणाºया एकूण खर्चाच्या ५५ टक्के हिस्सा जेएनपीटीस उचलावा लागणार आहे.याशिवाय महाराष्ट्र शासन, मध्य प्रदेश शासन आणि सागरमाला प्रकल्प यांचा प्रत्येकी १५ टक्के असा हिस्सा राहणार आहे.महाराष्ट्र शासनाने असा उचलला खर्चमहाराष्ट्राच्या हिश्श्याचे १५ टक्के अर्थात ५१६ कोटी ९६ लाख रुपये आहेत. त्यातील खोदकाम रॉयल्टीचे १४० कोटी ८६ लाख आणि शासकीय जमिनीचे मूल्य १५ कोटी २५ लाख असे वळते केले असून, उर्वरित ३५८ कोटी ८५ लाख रुपये पाच वर्षांत देण्यात येणार आहेत, तसेच पर्यावरणविषयक आणि इतर परवानग्यांसाठी शासन सहकार्य करणार आहे.अशी आहेत मार्गाची वैशिष्ट्येएकूण रेल्वेमार्गाची लांबी ३६२ किमीराज्यातील रेल्वेमार्गाची लांबी १७६ किमीमध्य प्रदेशातील रेल्वेमार्गाची लांबी १७६ किमीरेल्वेमार्ग प्रकार -विद्युत ब्रॉड गेजरेल्वेमार्गाची गती १२० किमीमार्गावर एकूण स्थानके १३लागणारी जमीन २००८ हेक्टर (महाराष्ट्र ९६४ हेक्टर)एकूण प्रस्तावित किंमत ८५७४.७९ कोटी

टॅग्स :railwayरेल्वेJNPTजेएनपीटी