भारत-पाक संबंध चर्चेतून सुधारू शकतात- देवेंद्र दर्डा

By Admin | Updated: June 3, 2016 22:10 IST2016-06-03T16:39:47+5:302016-06-03T22:10:30+5:30

भारत आणि पाकिस्तान या देशांच्या भांडणातून दोन्ही देशांचे खूप मोठं नुकसान झालं

Indo-Pak relations can improve from the debate - Devendra Darda | भारत-पाक संबंध चर्चेतून सुधारू शकतात- देवेंद्र दर्डा

भारत-पाक संबंध चर्चेतून सुधारू शकतात- देवेंद्र दर्डा

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 03 - ' भारत आणि पाकिस्तान या देशांच्या भांडणातून दोन्ही देशांचे खूप मोठं नुकसान झालं आहे. संवाद आणि चर्चेतूनच भारत-पाकदरम्यान संबंध सुधारू शकतात,' असे मत लोकमत मीडिया प्रा.लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी व्यक्त केलं. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'नॉलेज सीरिज' अंतर्गत 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध' या चर्चासत्रादरम्यान ते बोलत होते. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित या चर्चासत्रातील प्रमुख वक्ता आहेत. 
नागपूरमधील रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथील या चर्चासत्राचे उद्घाटन अब्दुल बासित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रियांका चतुर्वेदी, शेषाद्री चारी, विवेक काटजू, जतीन देसाई सहभागी झाले असून दोन्ही देशांतील संबंधाबाबत जाणून घेण्यास उत्सुक असलेले शेकडो नागरिकही चर्चासत्रात उपस्थि आहेत.
 
( Live : भारत-पाक शांतिप्रक्रिया चर्चासत्रास सुरूवात)
 
  •  
 

Web Title: Indo-Pak relations can improve from the debate - Devendra Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.