भारत-जर्मनी विद्यार्थी स्नेहबंध
By Admin | Updated: September 29, 2014 07:28 IST2014-09-29T07:28:27+5:302014-09-29T07:28:27+5:30
जर्मन सरकार आणि भारत सरकार यांच्या विद्यार्थी शैक्षणिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत या वर्षी ११ भारतीय विद्यार्थ्यांची एक तुकडी जर्मनीमध्ये १५ दिवसांच्या वास्तव्याकरिता गेली होती.

भारत-जर्मनी विद्यार्थी स्नेहबंध
जयंत धुळप, अलिबाग -जर्मन सरकार आणि भारत सरकार यांच्या विद्यार्थी शैक्षणिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत
या वर्षी ११ भारतीय विद्यार्थ्यांची एक तुकडी जर्मनीमध्ये १५ दिवसांच्या वास्तव्याकरिता गेली होती.
‘लसीकरण’ हा अत्यंत आगळा विषय त्यांच्या अभ्यासाचा होता. प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याला एक जर्मन विद्यार्थी जोडीदार म्हणून देण्यात आला होता आणि त्याच जर्मन विद्यार्थ्यांच्या घरी भारतीय विद्यार्थी मुक्कामाला होते. त्यातून जर्मन घरातील चालीरिती, संस्कृती आणि कुटुंबपद्धती यांचा आनंददायी अभ्यास झाल्याचा अनुभव या भारतीय विद्यार्थ्यांच्या चमूतील अलिबाग येथील जुई रविकांत मेहता या विद्यार्थिनीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.