पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे संकेत
By Admin | Updated: July 4, 2016 02:34 IST2016-07-04T02:34:33+5:302016-07-04T02:34:33+5:30
स्पार्क संस्थेच्या दलालांनी केलेल्या प्रकल्पबाधित पुनर्वसन घोटाळ्या संदर्भात लवकरच बैठक लावण्यात येवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल
_ns.jpg)
पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे संकेत
मुंबई : एमएमआरडीएतील भ्रष्ट अधिकारी आणि स्पार्क संस्थेच्या दलालांनी केलेल्या प्रकल्पबाधित पुनर्वसन घोटाळ्या संदर्भात लवकरच बैठक लावण्यात येवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश नगरविकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले आहेत, अशी माहिती वीर जीजामाता रहिवाशी सेवा संस्थेचे अध्यक्ष राजीव कदम यांनी दिली.
२000 ते २00५ पर्र्यतच्या आझाद मैदान, क्रॉस मैदान, महालक्ष्मी, परेल, पी. डिमेलो रोड, सायन, कुर्ला, जोगेश्वरी, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द येथील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी एमएमआरडीएने जागतिक बँकेच्या सहाय्याने झोपडपट्टयांचे स्थलांतर करून इमारतीत पुनर्वसन करण्याचा प्रकल्प राबविला होता. या प्रकल्पासाठी स्पार्क संस्थेने लोकांच्या राहत्या घरांचा सर्व्हे करून तपशीलवार माहिती एमएमआरडीएला देण्याचे ठरले होते. परंतु या कामात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार होत एमएमआरडीएला खोटी माहिती देण्यात आल्याचा आरोप राजीव कदम यांनी केला आहे.
खरे प्रकल्पबाधित आजही १२ वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अपात्र म्हणत मानखुर्द, वडाळा, कोकरी आगारमध्ये खितपत पडलेले आहेत. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी म्हणून राजीव कदम यांनी डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी यासंदर्भात लवकरच एक बैठक बोलविण्यात येणार असून त्यात कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिल्याचे कदम यांनी सांगितले.