शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Coronavirus: ब्रिटन, ब्राझील नाही! राज्यात ५० टक्के काेरोनाबाधितांमध्ये आढळला भारतीय प्रकारचा विषाणू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 06:44 IST

Coronavirus: मुंबईतील नमुन्यांत आढळला नाही विषाणू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातून जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवलेल्या कोविड पॉझिटिव्हच्या ५० टक्के सॅम्पल्समध्ये SARS-CoV-2 नावाचा नवा आणि अत्यंत संसर्गजन्य असा भारतीय प्रकारचा विषाणू आढळला आहे. या विषाणूच्या प्रकाराला B.1.617 म्हटले जात आहे. बहुतांश नमुने विदर्भातील आहेत आणि मुंबईत शहरातून पाठवण्यात आलेल्या कोणत्याही नमुन्यात आतापर्यंत B.1.617 प्रकारचा विषाणू आढळलेला नाही. सॅम्पल्सची जिनोमिक सिक्वेंसिंग करणाऱ्या दहा प्रयोगशाळांचा ग्रुप INSACOG शास्त्रज्ञांनी याची माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत संपूर्ण जिनोम सिक्वेंसिंग प्रोजेक्टबद्दल अधिक विस्तृत माहिती दिलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १३ हजार ६१४ नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी दहा INSACOG प्रयोगशाळांना पाठवले गेले होते. यापैकी १ हजार १८९ सॅम्पल SARS COV-२ प्रकारचे आढळून आले, जे भारतात चिंतेचा विषय आहेत. यामध्ये यूके वेरिएंटचे १ हजार १०९, दक्षिण आफ्रिकी वेरिएंटचे ७९ नमुने आणि ब्राझीलच्या एका नमुन्याचा समावेश आहे.

जिनोमिक सिक्वेंसिंग म्हणजे काय?nकोरोना विषाणूची जनुकीय संरचना बदलली आहे का, हे ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे जिनोम सिक्वेंसिंग होय. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, या प्रक्रियेमुळे विषाणू कुठे आणि किती पसरला याची महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास मदत होते. देशातील महत्त्वाच्या प्रयोगशाळांत जिनोम सिक्वेंसिंगसाठी आलेल्या नमुन्यांचा अभ्यास युद्धस्तरावर सुरू आहे. विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल झाला आहे का, हे शोधण्यासाठी जुना आणि नवीन दोन्ही विषाणूंना मॅच केले जाते. जिनोम सिक्वेंसिंगमध्ये बदल जास्त दिसून आला तर, नवीन प्रकारचा स्ट्रेन असल्याचे समजले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या