शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Indian tree day; सत्तर वर्षांपूर्वीचा साक्षीदार असलेला सोलापुरातील ‘वटवृक्ष’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:07 IST

तथागत गौतम बुद्धांना बिहारमधील गया या ठिकाणी पिंपळ झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते.

संताजी शिंदे सोलापूर : सम्राट अशोकाचा चिरंजीव राजा महेंद्र याने लावलेल्या पिंपळ वृक्षाची फांदी डोक्यावर घेऊन सोलापुरात आणण्यात आली अन् फॉरेस्टमधील गुडहॉल यांच्या जमिनीत लावली गेली़ आज त्याचा वटवृक्ष झालायं. सत्तर वर्षांपूर्वीचा साक्षीदार असलेला पिंपळ वृक्ष डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आजही मायेची सावली देतोयं.

धम्म प्रचारक भन्ते एस.परमशांती हे सोलापूरातील फॉरेस्ट परिसरातील लोकांना ते बौद्ध धम्माची माहिती देत होते. १९५९ साली श्रीलंका येथे जागतिक स्तरावरील श्रामणेर शिबीर भरवण्यात आले होते. तेथे ते फॉरेस्टमधील ९ लोकांना सोबत घेऊन श्रीलंकेला गेले. तेथूनच त्यांनी हा पिंपळ वृक्षाची फांदी सोलापुरात आणली आणि सध्या जी डॉ. आंबेडकर मेमोरियल हास्कूलच्या प्रांगणात लावली. तथागत गौतम बुद्धांना बिहारमधील गया या ठिकाणी पिंपळ झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. पिंपळाच्या झाडाची फांदी सम्राट अशोकाचा मुलगा राजा महिंद्र याने श्रीलंकेला नेली. तेथे लावण्यात आलेल्या फांदीचे मोठे वटवृक्ष झाले आहे. त्याच पिंपळ झाडाची फांदी भन्ते एस. परमशांती व त्यांच्या सहकाºयांनी डोक्यावर आणली.

चेन्नई ते मुंबई या रेल्वेतून प्रवास करताना खाली न ठेवता त्यांनी पाळी-पाळीने ती डोक्यावर घेतली होती. फॉरेस्टमध्ये आणल्यानंतर पिंपळ वृक्षाची छोटी मिरवणूक काढून त्याचे महत्व स्थानिक लोकांना सांगण्यात आले होते. भन्ते यांची सेवा व झाडाची निगा तत्कालीन मारूती सुरवसे व साधू शेंडगे करीत होते. याच जागेत डॉ. आंबेडकर हायस्कूलची स्थापना झाली आणि हे झाड विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात सावलीचे थंड ठिकाण झाले आहे. सध्या शाळेचे शिपाई शिरीष सुरवसे हे या झाडाची निगा राखत आहेत. 

येथे होते मिरवणुकीची सांगता...- गौतम बुद्ध जयंतीनिमित्त शहरातून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीची सांगता या पिंपळ (बोधी) वृक्षाजवळ होत असते. विविध सामाजिक संघटना, तरूण मंडळांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीची सांगता याच पिंपळ वृक्षाजवळ होते. बौद्ध गयेच्या मातीतून श्रीलंकेच्या मातीत उगवलेले पिंपळाचे झाड आज सोलापूरच्या मातीत उगवले आहे. 

ज्या पिंपळ वृक्षाखाली तथागत गौतम बुद्धांचे वास्तव्य झाले. बौद्ध गयेचा अंश असलेले पिंपळाचे झाड आज डॉ. आंबेडकर हायस्कूलमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात उभे आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. - भागवत सरवदे, अध्यक्ष, डॉ. आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणTemperatureतापमान