भारतीय समाज नेहमीच सहिष्णू - जावेद अख्तर
By Admin | Updated: November 29, 2015 02:39 IST2015-11-29T02:39:08+5:302015-11-29T02:39:08+5:30
भारतीय समाज नेहमीच सहिष्णू होता आणि आजही आहे. परंतु आपण काही वेळा टोकाच्या भूमिका घेतो. मुळातच सत्य याच दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक जावेद

भारतीय समाज नेहमीच सहिष्णू - जावेद अख्तर
पुणे : भारतीय समाज नेहमीच सहिष्णू होता आणि आजही आहे. परंतु आपण काही वेळा टोकाच्या भूमिका घेतो. मुळातच सत्य याच दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी येथे केले.
भारतातील चित्रपट निर्मितीच्या कलेविषयी चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आणि दिग्दर्शक राजू हिरानी यांनी संवाद साधला. पुण्यापासून सुरू झालेला हा कार्यक्रम इतर शहरांत देखील होणार आहे. चित्रपट निर्मितीमधील उत्कृष्टता याविषयी विविध मान्यवर मत मांडणार आहेत.
सेन्सॉर बोर्डबद्दल बोलताना अख्तर म्हणाले, एकंदरच या बोर्डामध्ये उच्च गुणवत्ता असलेली माणसे असणे महत्त्वाचे आहे.
उत्कृष्ट चित्रपटाची व्याख्या सांगताना अख्तर म्हणाले, परिपूर्ण चित्रपटाची अशी कोणतीही व्याख्या नसते. चित्रपट चांगला झाल्यानंतरच तुम्हाला ते समजते. याच अनिश्चिततेमुळे चित्रपट निर्मिती अधिक रंजक असते. राजू हिरानी म्हणाले, की चित्रपटाचा कोणताही फॉर्म्युला नसतो. जर एखादा फॉर्म्युला वारंवार वापरला तर धोकादायक ठरतो. त्यामुळे अभिनव चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एफटीआयआयच्या प्रश्नावर बोलताना राजू हिरानी म्हणाले, विद्यार्थी आणि प्रशासन या दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न मी करीत आहे. त्यामुळे त्यावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. (प्रतिनिधी)
दुर्लक्ष केले पाहिजे
आमिर खानच्या वक्तव्यावर उठलेल्या वादळाबाबत हिरानी म्हणाले की,आमिर खानने स्वत:हून येऊन पत्रकार परिषद घेतली नव्हती. त्याच्या मुलाखती दरम्यान तो बोलला. ती मुलाखत जर नीट पाहिली तर त्याने निरागसपणे उत्तर दिले आहे. खरे तर या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे होते. त्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा त्यावर पडदा टाकणे गरजेचे आहे.