भारतीय नौदलाचे ‘आॅपरेशन राहत’!

By Admin | Updated: April 6, 2015 03:33 IST2015-04-06T03:33:29+5:302015-04-06T03:33:29+5:30

अंतर्गत युध्द सुरु असलेल्या येमेन देशातून भारतीयांना सुखरुपपणे परत आणण्याचे काम भारतीय नौदल आणि हवाई दलाकडून सध्या केले जात आहे.

Indian Navy's 'Operation Relief'! | भारतीय नौदलाचे ‘आॅपरेशन राहत’!

भारतीय नौदलाचे ‘आॅपरेशन राहत’!

मुंबई : अंतर्गत युध्द सुरु असलेल्या येमेन देशातून भारतीयांना सुखरुपपणे परत आणण्याचे काम भारतीय नौदल आणि हवाई दलाकडून सध्या केले जात आहे. या दोन्ही दलाकडून चोख कामगिरी बजावली जात असतानाच नौदलाकडून ‘आॅपरेशन राहत’ या नावाखाली आणखी एक धाडसी कामगिरी करण्यात आली आहे. येमेनमधील एडेन बंदर येथून ४११ जणांची सुटका करुन त्यांना ‘आयएनएस मुंबई’ वर आणण्यात आले. यामध्ये ४४१ परदेशी नागरीक असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. हे जहाज या आॅपरेशननंतर भारताच्या दिशेने रवाना झाले.
येमेनमध्ये सध्या अंतर्गत युध्द सुरु असून एडेन शहरात तर मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री सुरु आहे. या युध्दामुळे येमेनमध्ये अनेक देशातील नागरीक अडकले असून प्रत्येक देशाकडून आपल्या नागरीकांना अनेक पर्यायी मार्गाने बाहेर काढले जात आहे. यामध्ये भारतानेही आपल्या नागरीकांना येमेनमधून परत आणले आहे. नौदलाने तर ३0 मार्चपासून येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी ‘आॅपरेशन राहत’नावाने कामगिरीच सुरु केली असून आतापर्यंत तीन कामगिरी बजावण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब घटना म्हणजे ४ एप्रिल रोजी येमेनच्या आदेन येथील बंदरातून ४४१ जणांची सुटका करण्यात नौदलाला यश आले आहे. एडेनमधील बंदरात ४४१ जण अडकले होते. त्यांना आणण्यासाठी नौदलाची आयएनएस मुंबई या जहाजाला रवाना करण्यात आले होते. मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेला गोळीबार आणि बंदरात येण्याची नसलेली परवानगी यामुळे आयएनएस मुंबई जहाज एडेन बंदरापासून जवळपासच उभे राहिले. नौदलाने तातडीने हालचाली करुन एडेन बंदरातून बारा भाड्याचा छोट्या बोटी घेतल्या आणि त्यांच्या सहाय्याने आयएनएस मुंबई जहाजावर ४४१ जणांना पोहोचविण्यात आले. यामध्ये १७६ जण हे परदेशी नागरीक आहेत. त्यानंतर हे जहाज भारताच्या दिशेने रवाना झाले. हे आॅपरेशन सुर्यास्त होण्यापूर्वी करण्यात आल्याचे नौदलाचे प्रवक्ते सिन्हा यांनी सांगितले.

Web Title: Indian Navy's 'Operation Relief'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.