शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Indian Army: पाटणच्या सुपुत्राची गगनभरारी! विमानातून २२ हजार फुटांवरून उडी घेत हवेत फडकवला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 19:46 IST

Indian Army: पाटण तालुक्यातील चोपदारवाडी येथील सूरज शेवाळे या पॅरारेजिमेंट कमांडोने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जम्मु काश्मीर मध्ये चार्टर विमानातून तब्बल २२ हजार फूट उडी मारून स्वातंत्र्याचा तिरंगा हवेत फडकवला.

- निलेश साळुंखेकोयनानगर- पाटण तालुक्यातील चोपदारवाडी येथील सूरज शेवाळे या पॅरारेजिमेंट कमांडोने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जम्मु काश्मीर मध्ये चार्टर विमानातून तब्बल २२ हजार फूट उडी मारून स्वातंत्र्याचा तिरंगा हवेत फडकवला. सूरज शेवाळे हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चोपदारवाडी या गावचा सुपुत्र असून तो २०१७ मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाला असून, सध्या तो जम्मू काश्मीर मध्ये सेवा बजावित आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सूरजने हवेत तिरंगा फडकविण्याचा निर्धार केला होता. दरम्यान, सूरज चे प्राथमिक शिक्षण हे गव्हाणवाडी-चोपदारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक शिक्षण मरळी  येथील कै वत्सलादेवी देसाई हायस्कूल मध्ये झाले तर उच्चमाध्यमिक शिक्षण पाटण येथील बाळासाहेब देसाई विद्यालयात झाले.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरज लहानपणापासूनच अत्यंत जिद्दी मेहनती,धाडशी आणि हुशार  होता म्हणूनच त्याने सैनिक होउन देशसेवेचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पार पाडले असल्याची प्रतिक्रिया सूरजची आई  लता शेवाळे यांनी माहिती  दिली.

सुरज यांनी दाखवलेले धाडस व देशप्रेम आम्हा ग्रामस्थासाठी अभिमानास्पद आहे त्याच्या या कामगिरीबद्दल चोपदारवाडी ग्रामस्थाच्यावतीने अभिनंदन  पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. - आनंदराव शिंदे, सरपंच, चोपदारवाडी

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSatara areaसातारा परिसर