भारताला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही - असदुद्दीन ओवेसी

By Admin | Updated: March 8, 2017 19:22 IST2017-03-08T19:22:28+5:302017-03-08T19:22:28+5:30

धर्मनिरपेक्ष असलेल्या हिंदुस्थानला मी कधीही हिंदू राष्ट्र बून देणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे

India will not become a Hindu Nation - Asaduddin Owaisi | भारताला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही - असदुद्दीन ओवेसी

भारताला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही - असदुद्दीन ओवेसी

>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 8 - धर्मनिरपेक्ष असलेल्या हिंदुस्थानला मी कधीही हिंदू राष्ट्र बून देणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. लातूरमध्ये आयोजित सभेत बोलत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपावरही सडकून टीका केली.  काँग्रेसचं सेक्युलर तर भाजपाचं राष्ट्रवादाचं दुकान मी बंद करणार, असल्याचा घणाघात असदुद्दीन ओवेसींनी केला आहे.
 
असदुद्दीन ओवेसींनी भाजपावर निशाणा साधताना 'भारतात हजारो जाती धर्माचे लोक राहतात. भारतासारखं राष्ट्र जगात कुठेही मिळणार नाही. त्यामुळे भारताला एका धर्माचं राष्ट्र कधीच होऊ देणार नाही', असं म्हटलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम, महाराष्ट्र विकास आघाडी, शेतकरी संघटना यांनी एकत्र येत परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे.
 

Web Title: India will not become a Hindu Nation - Asaduddin Owaisi