शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साखर उत्पादनात भारताने ब्राझीलला टाकले मागे, जगात पहिल्या क्रमांकावर; देशात महाराष्ट्र अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 06:23 IST

यंदाच्या गाळप हंगामात भारताने साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवला.

पुणे :

यंदाच्या गाळप हंगामात भारताने साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवला. भारतात महाराष्ट्र अव्वल ठरला असून उत्तर प्रदेश पीछाडीवर गेला आहे. देशात यंदा ३५७ लाख टन साखर उत्पादन झाले असून महाराष्ट्राचा त्यातील वाटा १३८ लाख टनांचा आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. 

देशाचे व देशात महाराष्ट्राचे हे साखरेचे विक्रमी उत्पादन आहे. ब्राझीलने त्यांचे साखर उत्पादन इथेनॉलकडे वळवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर कमी पडली व ती पोकळी भारताने तसेच महाराष्ट्राने भरून काढली. भारतामधून झालेल्या ९० लाख टन साखरेपैकी ५६ टक्के साखर एकट्या महाराष्ट्राने निर्यात केली आहे. साखरेबरोबरच यंदा इथेनॉल उत्पादनातही राज्यातील साखर क्षेत्राने आघाडी घेतली आहे. २०० कोटी लीटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता राज्याने प्राप्त केली आहे. त्यापैकी ११२ कोटी लीटर इथेनॉलचे करार राज्यातील साखर कारखान्यांनी वेगवेगळ्या ऑइल कंपन्यांबरोबर केले आहेत.प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतल्यामुळेही साखर उद्योगात शिस्त आली, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. संपूर्ण एफआरपी दिल्याशिवाय गाळपासाठी परवानगी दिली गेली नाही, एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची टक्केनिहाय नावे जाहीर केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस कुठे टाकायचा याचा निर्णय घेता आला. गुणपत्रकात तळाला गेले की बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणी येणार असल्याने कारखान्यांनीही वरच राहण्याचा प्रयत्न केला, असे काही निर्णय उपयोगी ठरले असे ते म्हणाले.

- यंदा १९९ कारखान्यांनी १३२०.३१ लाख टन उसाचे गाळप केले. त्यातून १३८ लाख टन साखर निर्माण झाली. सरासरी ऊस उतारा १०.४० असा होता. - २४० दिवस हंगाम झाला. त्यातील सरासरी १७३ दिवस गाळप झाले. सहवीज निर्मिती मधून कारखान्यांना अडीच हजार कोटी रुपये मिळाले. - विक्रमी गाळप होऊनही कारखान्यांना इथेनॉलचे, निर्यातीचे सहवीज निर्मितीचे पैसे लगेचच मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आतापर्यंत एफआरपीचे (उसाची रास्त किफायतशीर किंमत) ९६ टक्के पैसे मिळाले. - त्यामुळे आर्थिक स्तरावर कारखाने, शेतकरी अशा दोन्ही घटकांना यंदाचा गाळप हंगाम दिलासा देणारा ठरला असे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेIndiaभारत