शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३७० कलम हटवून भारताचा जगाला दिला प्रखर संदेश : विनय सहस्त्रबुद्धे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:18 IST

अणुचाचण्यांप्रमाणे ३७० कलमाविषयीचा संदेश जगाला गेला आहे...

ठळक मुद्देडॉ. राजागोपाला चिदंबरम यांना ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार’ प्रदान

पुणे : भारताने  १९७४ मध्ये इंदिरा गांधींच्या कार्यकाळात आणि १९९८ मध्ये अटबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात अणुचाचणी करून जगाला संदेश दिला होता. त्यानंतर आता २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ३७० कलम हटवून जागाला प्रखर संदेश दिला आहे. अणुचाचण्यांप्रमाणे ३७० कलमाविषयीचा संदेश जगाला गेला आहे. स्वदेश रक्षण हाच बाजीराव पेशव्यांप्रमाणे आपला उद्देश होता, असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.  थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१९ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार’हिंदुस्थान सरकारचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार पद्मविभूषण डॉ. राजागोपाला चिदंबरम यांना खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते प्रदान केला. खासदार गिरीष बापट, आमदार मेधा कुलकर्णी, उदय सिंह पेशवा, अनिरुद्ध देशपांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, अनिल गानू उपस्थित होते. सहस्त्रबुद्धे म्हणाले, परदेशात बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीचा अभ्यास केला जातो. मात्र, आपल्याकडे वीरांची उपेक्षा होत असून ती थांबविणे गरजेचे आहे. वीरांचे स्मारक होणे, आठवण ठेवण्याकरीता कार्यक्रम करणे आवश्यक असले, तरी बाजीराव पेशवे यांच्या रणनिती अभ्यासाविषयी साक्षरता होणे आवश्यक आहे.डॉ. चिदंबरम म्हणाले, कोणत्याही देशाचा विकास हा संरक्षणाविना आणि संरक्षण हे विकासाविना होणे अर्थहिन आहे. आपल्या देशाचा विकास झपाटयाने होत असला, तरी देखील सुरक्षेच्या दृष्टीने आपण सर्तक असणे आवश्यक आहे. केवळ शस्त्रास्त्र संपन्न किंवा संरक्षण शास्त्रापुरते नाही, तर उर्जा, पाणी व वातावरणाविषयी संरक्षण असणे गरजेचे आहे. आजच्या काळात सायबर सिक्युरिटी देखील अत्यावश्यक आहे. हिंदुस्थान संरक्षणासोबतच विकासही करीत असून नव्या तंत्रज्ञानाची ओळख देशाला करुन देणारा आपला देश असावा, ही आपली इच्छाशक्ती प्रबळ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उदयसिंग पेशवा, खासदार गिरीष बापट, भूषण गोखले यांनीही आपले विचार व्यक्त केले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत नगरकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरGovernmentसरकार