शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

अफगाणिस्तान पुनर्उभारणीत भारताने मदत करावी लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:15 AM

अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीमध्ये भारताने प्रशासन सुधार, व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, क्षमतावर्धन या बाबींमध्ये मदत करावी, अशी अपेक्षा अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सरवर दानिश यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केली.

मुंबई : अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीमध्ये भारताने प्रशासन सुधार, व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, क्षमतावर्धन या बाबींमध्ये मदत करावी, अशी अपेक्षा अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सरवर दानिश यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केली.अफगाणिस्तान आणि भारत या देशांमधील संबंधांना अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. हजारो वर्षांपासून उभय देशांमध्ये तसेच लोकांमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण होत आहे. अलीकडच्या काळात भारत अफगाणिस्तानला माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, रस्ते बांधणी, ऊर्जा संचरण, या क्षेत्रात सहकार्य करत असून उभय देशांमधील राजकीय-आर्थिक संबंध झपाट्याने दृढ होत आहेत. अशा प्रकारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मैत्रीसंबंधाचे नवे पर्व सुरू झाल्याबद्दलही सरवर दानिश यांनी समाधान व्यक्त केले.भारतभेटीवर आलेल्या दानिश सरवर यांनी रविवारी (दिनांक १०) महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते. अफगाणिस्तान भारताशी आर्थिक, व्यावसायिक, राजकीय, सामरिक, सुरक्षाविषयक, सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक आहे. चाबहार बंदरामुळे व्यापाराला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अफगाणिस्तानातील ५००० विद्यार्थी भारतीय शिष्यवृत्तीवर महाराष्ट्रात शिक्षण घेत असून एकट्या पुणे येथे ३५०० अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगत भारताने विद्यार्थी शिष्यवृत्तींची संख्या अधिक वाढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तान भारतासह विविध शहरांमध्ये आगामी काळात संयुक्त सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.भारताचा सच्चा मित्र - राज्यपालअफगाणिस्तान भारताचा सच्चा मित्र राहिला असून अफगाणिस्तानने काबुल तसेच इतर शहरांपासून थेट मुंबईसाठी विमान सेवा सुरू करावी. उभय देशांमध्ये हवाई वाहतूक तसेच चाबहार बंदराच्या माध्यमातून सागरी मार्ग सुरू झाल्यास व्यापार तसेच पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी या वेळी केले. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र