शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही; भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 06:04 IST

subramanian swamy : एवढेच नाही तर पाकिस्तान आणि नियंत्रण (एलओसी) रेषेसारख्या संवेदनशील मुद्यांवरही स्वामी भाष्य करीत आहेत.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी केंद्र सरकारवर अंतर्गत सुरक्षा आणि विदेशी मुद्यावरून टीका करीत असतात. त्यांनी मोदी सरकारला चीनच्या डावपेचांबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता.

एवढेच नाही तर पाकिस्तान आणि नियंत्रण (एलओसी) रेषेसारख्या संवेदनशील मुद्यांवरही स्वामी भाष्य करीत आहेत. यादरम्यान, लडाखस्थित प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएलसी) भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी होत नसल्याचा दावा करणाऱ्या एका अहवालावर स्वामी म्हणाले की, “मला असे जाणवत आहे की, संघर्षाच्या ठिकाणावरून फक्त भारत मागे व चीन पुढे सरकला आहे.”

ट्विटरवर एका यूजरने सुब्रमण्यम स्वामी यांना टॅग करताना म्हटले की,“संघर्षाच्या एक वर्षानंतरही भारत आणि चीन यांना आपल्यातील तणाव कमी करायचे आहे.” यूजरने ट्विटमध्ये एक अहवालही शेअर केला. त्यात म्हटले की, लडाखस्थित नियंत्रण रेषेवर दोन्ही देशात स्थिती तणावपूर्ण बनलेली आहे. यावर सुब्रमण्यम स्वामी म्हटले की,“आता मला जाणवत आहे की, फक्त भारताने माघार घेतली. ”

जबाबदारी घेतली नाही- चीनविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्वामी यांनी सतत म्हटलेले आहे. गेल्या महिन्यात त्यांनी म्हटले होते की, चीन भारत आणि भूतानची जमीन बळकावत आहे. - या परिस्थितीत घाबरून जाऊन चीनला उत्तर दिले जाऊ शकत नाही. काही दिवसांनी स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य करीत ट्विटरवर म्हटले होते की, या सरकारमधील कुणीही चीन लडाखमध्ये भारताची जमीन बळकावत असताना त्याला अडविण्याची जबाबदारी घेतली नाही.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीIndiaभारतchinaचीन