स्वतंत्र विदर्भाची पुंगी वाजवणा-यांचे सोनाराने कान टोचले - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: May 28, 2015 09:41 IST2015-05-28T09:38:23+5:302015-05-28T09:41:01+5:30
स्वतंत्र विदर्भाची पुंगी वाजवणा-यांचे सोनारानेच कान टोचले असून 'अमित'वाणीने स्वतंत्र विदर्भाचा प्रश्नच निकाली निघाला आहे असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
स्वतंत्र विदर्भाची पुंगी वाजवणा-यांचे सोनाराने कान टोचले - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - स्वतंत्र विदर्भाची पुंगी वाजवणा-यांचे सोनारानेच कान टोचले असून 'अमित'वाणीने स्वतंत्र विदर्भाचा प्रश्नच निकाली निघाला आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवरुन घुमजाव केले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला चिमटे काढले आहेत. स्वतंत्र विदर्भाची पुंगी वाजवणा-यांचे सोनाराने कान टोचले. अमित शहांची भूमिका ही नरेंद्र मोदींची भूमिका आहे असे आम्ही मानत असून अमितवाणीने स्वतंत्र विदर्भाचा प्रश्नच निकाली निघाला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. राम मंदिर, समान नागरी कायदा, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० या मुद्द्यांवरुन भाजपाने घुमजाव केले नाही, सद्य स्थितीत मोदी - शहा जोडीने व्यवहार्य भूमिका घेऊन काम करवण्याचे ठरवले आहे. हीच व्यवहार्य भूमिका जैतापूरच्या बाबतीत घेऊन लोकभावना लक्षात घ्यावात, असे केल्यान संपूर्ण राज्य भाजपाची हत्तीवर बसवून मिरवणूक काढले असेही ठाकरेंनी नमूद केले.