पिंपरी गावासाठी स्वतंत्र विकास आराखडा
By Admin | Updated: December 8, 2014 02:41 IST2014-12-08T02:41:12+5:302014-12-08T02:41:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील आदर्श ग्राम योजनेत कल्याण तालुक्यातील पिंपरी गावाची निवड खा. राजन विचारे यांनी केली आहे

पिंपरी गावासाठी स्वतंत्र विकास आराखडा
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील आदर्श ग्राम योजनेत कल्याण तालुक्यातील पिंपरी गावाची निवड खा. राजन विचारे यांनी केली आहे. त्या ठिकाणच्या मुलभूत समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यातील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्या गावासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या संदर्भात विशेष बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संपन्न झाली.
गावातील लोकाना पिण्याची पाण्याची समस्या भेडसावत असून गावाची लोकसंख्या ३८४१ असून गावासाठी वेगळी पाणी पुरवठा योजना आखण्यात येणार आहे. याशिवाय गावातील अतंर्गत रस्ते, रोड लाईट, तलाव सुशीभीकरण, सार्वजनिक शौचालय, गटार, सार्वजनिक वाचनालयाची इमारत, स्मशानभूमी, नवीन अगण वाडी, जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती व सरक्षक भिंत ,समाज मंदिराची दुरुस्ती, उद्यानेआदी कामे देखील विकास आराखड्यात प्रस्तावित दाखवण्यात आली आहेत. त्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली व गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कोणत्या योजनाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, याची सविस्तर चर्चा केली. या कोयना धरणाच्या बांधकामासाठी विस्तापित झालेल्या या गावातील प्रकल्प ग्रताना पाणी पुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरु करावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीला उप विभागीय अधिकारी एस. गिरासे , ठाणे तहसीलदार विकास पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)