शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

...आता शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंटचा स्वतंत्र अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 05:45 IST

येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व २१ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यापूर्वी केवळ सहा संस्थांमध्ये शाकाहार व मांसाहार असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील शाकाहारी विद्यार्थ्यांना केवळ शाकाहाराची पदवी घेण्याचे पर्याय खुले झाले आहेत.

पुणे : येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व २१ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यापूर्वी केवळ सहा संस्थांमध्ये शाकाहार व मांसाहार असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील शाकाहारी विद्यार्थ्यांना केवळ शाकाहाराची पदवी घेण्याचे पर्याय खुले झाले आहेत.हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पुण्यातील सनदी लेखापाल चंद्रशेखर लुणिया हे सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. या पाठपुराव्यामुळे मागील दोन वर्षांत पर्यटन मंत्रालयांतर्गत असलेल्या सहा केंद्रीय संस्थांमध्ये असा अभ्यासक्रम सुरू झाला. आता उर्वरित १५ संस्थांमध्येही शाकाहारी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी लुणिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, अचल जैन, नरेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात सुमारे ४० विषय शिकविले जातात. त्यामध्ये एक विषय अन्नपदार्थ बनविणे हा आहे. त्याअंतर्गत शाकाहारी व मांसाहारी पदार्थ शिकविले जातात. त्यामुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना इच्छा नसताना मांसाहाराचे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी अभ्यासक्रमात शाकाहारी पर्याय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. दोन वर्षांपूर्वी गांधीनगर, भोपाळ व जयपूर तर मागील वर्षी चेन्नई, हाजीपूर व शिलाँग येथील संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.येत्या शैक्षणिक वर्षापासून उर्वरित संस्थांमध्ये हा पर्याय देण्याचा निर्णय पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना शाकाहारी पदार्थ बनविण्याचे स्वतंत्र प्रशिक्षण घेण्यासाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत, असे लुणिया यांनी सांगितले.

टॅग्स :hotelहॉटेलMaharashtraमहाराष्ट्रeducationशैक्षणिक