महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पासांठी स्वतंत्र कंपनी
By Admin | Updated: February 12, 2015 03:04 IST2015-02-12T03:04:00+5:302015-02-12T03:04:00+5:30
महाराष्ट्रातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांना वेग देण्यासाठी रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारच्या सहकार्याने मुंबईत रेल्वे समन्वय कंपनी स्थापन
_ns.jpg)
महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पासांठी स्वतंत्र कंपनी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांना वेग देण्यासाठी रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारच्या सहकार्याने मुंबईत रेल्वे समन्वय कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी होकार दिल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काही दिवसांपूर्वी याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यावर बोलताना प्रभू यांनी मंगळवारी सांगितले, की देशात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रकल्प रखडले असून ते पूर्ण करण्यासाठी तब्बल आठ लाख कोटी रूपयांची गरज आहे. रेल्वेची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने खासगी सहकार्यातून काही प्रकल्प मार्गी लागू शकतात का, याचाही शोध घेण्यात येणार आहे. मात्र खासगीकरणाचा कोणताही विचार नाही. संबंधित कंपनीत रेल्वेचे व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी असतील. त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिल्याचे ते म्हणाले.