इंदापुरात तीन घरे फोडली

By Admin | Updated: June 30, 2016 01:44 IST2016-06-30T01:44:35+5:302016-06-30T01:44:35+5:30

आज दुपारी बारा ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान शहराच्या हद्दवाढीतील भागात असणाऱ्या लोकवसाहतीत भरदिवसा तीन घरे फोडली.

Indapur has three houses in it | इंदापुरात तीन घरे फोडली

इंदापुरात तीन घरे फोडली


इंदापूर : आज दुपारी बारा ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान शहराच्या हद्दवाढीतील भागात असणाऱ्या लोकवसाहतीत भरदिवसा तीन घरे फोडली. यामध्ये ८६ हजारांची रोकड, ४ लाख २० रुपये किमतीचे १४ तोळे सोने असा ५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटून नेला आहे. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवण्याचे काम सुरु होते.
सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात कुलूपबंद असणारी घरे शोधून काढूनच चोरट्यांनी मजबूत हात मारला आहे. दाराचे कडी कोयंडे उचकाटून दरवाजा उघडून आत प्रवेश करुन चोरट्यांनी घरातले सामान अस्ताव्यस्त केले आहे. केवळ रोकड व दागिन्यांवरच त्यांनी हात साफ केला आहे. किंमती मोबाईल अथवा अन्य वस्तूंना हात लावलेला नाही. यामध्ये दोन शिक्षकांची घरे आहेत.
सविस्तर माहिती अशी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान दत्तात्रय चंद्रकांत भोंगळे (रा. साई अपार्टमेंट, बाब्रस मळा, विद्या प्रतिष्ठानजवळ, इंदापूर) यांच्या घरात पहिली घरफोडी झाली. ६ हजार रुपयांची रोकड व ९६ हजार रुपयांचे ३ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. भोंगळे हे त्यावेळी आपल्या पोंदकुलवाडी येथील शेतात गेले होते. त्यांच्या पत्नी विद्या प्रतिष्ठानमध्ये शिक्षिका आहेत. त्या शाळेत होत्या.
त्यानंतर दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास जयवंत विष्णू ताटे व डॉ. देविदास विठ्ठल बोंगाणे (दोघे रा. परिमल हौसिंग सोसायटी, पडस्थळ रोड इंदापूर) यांची घरे चोरट्यांनी फोडली. ताटे यांच्या घरातून ४५ हजार रोख, २ लाख ३० हजार रुपयांचे ६ तोळे सोने असा ऐवज त्यांनी लुटला. तर बोंगाणे यांच्या घरातून ३५ हजार रुपये व १ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ५ तोळे सोने लांबवले. ताटे हे एसबीआय बँकेत नोकरीस आहेत. त्यांच्या पत्नी बावड्यातील शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. डॉ. बोंगाणे आपल्या दवाखान्यात होते. तर त्यांच्या पत्नी आपल्या औषधाच्या दुकानात होत्या.
(वार्ताहर)

Web Title: Indapur has three houses in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.