अत्याचार पीडितांचे वाढतेय ‘मनोधैर्य’
By Admin | Updated: September 16, 2014 00:24 IST2014-09-16T00:24:14+5:302014-09-16T00:24:14+5:30
राज्यात दररोज एका महिलेवर, तर दोन बालकांवर अत्याचार होत असल्याची भयानक आकडेवारी महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

अत्याचार पीडितांचे वाढतेय ‘मनोधैर्य’
पुणो : राज्यात दररोज एका महिलेवर, तर दोन बालकांवर अत्याचार होत असल्याची भयानक आकडेवारी महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. पीडित व्यक्तींना पुन्हा उभे करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेच्या आकडेवारीनुसार हे विदारक सत्य समोर आले आहे.
बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुन्हेगारी क्षती साहाय्य व पुनर्वसन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची घटना घडल्यावर पोलीस प्रशासनाकडून या समितीला माहिती देण्यात येते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक होते. त्यानंतर संबंधित पीडितांना आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेसाठी राज्यातून 1 हजार 6क्1 अर्ज आले होते. त्यातील 452 पीडितांचे अर्ज तांत्रिक कारणाने बाद झाले असून, 1 हजार 149 पीडितांना त्याचा लाभ मिळाला आहे.
पीडित झालेल्या महिला व बालकांना मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी तातडीने आर्थिक मदत आणि मानसोपचारतज्ज्ञाची सेवा उपलब्ध करून देण्यात येते. मनोधैर्य योजनेनुसार अॅसिड हल्ल्यात जखमी मुलीला 5क् हजार रुपये, तर चेहरा विद्रूप झाल्यास तीन लाख रुपयांची मदत देण्यात येते. तर, बालकांवरील लैंगिक अत्याचार व बलात्कार या घटनांमध्ये दोन लाख, तर गंभीर प्रकरणांमध्ये तीन लाख रुपयांची मदत करण्यात येते. राज्यात घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये पीडित झालेल्या 1 हजार 149 जणांना मदत करण्यात आली आहे. यात 415 महिला व 734 बालकांचा समावेश आहे. यावरून बालकांवर अत्याचार होत असल्याचे पुढे आले आहे. महिला व बाल कल्याण विभागाचे उपआयुक्त डी. व्ही. हिवराळे म्हणाले, की मनोधैर्य योजनेमुळे पीडित महिलांना आधार देणो शक्य झाले आहे. पूर्वी अत्याचारीत व्यक्ती पुढे येत नसे, मात्र यात बदल झाला आहे. गेल्या वर्षभरात जवळपास 15 कोटींपेक्षा अधिक रक्कम पीडित महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी दिली आहे.(प्रतिनिधी)
ठाणो जिल्ह्यात सर्वाधिक अत्याचाराच्या 272 घटना घडल्या आहेत. पाठोपाठ मुंबई उपनगरमध्ये 87, चंद्रपूर 48, साता:यात 45, पुणो 42, औरंगाबाद 44, नाशिक 39, सोलापूर 37 व बुलडाण्यात 35 घटना घडल्या आहेत. तर, सर्वात कमी घटनांची नोंद अकोला 7, नंदुरबार 9, नगर व जालन्यात प्रत्येकी 11 अशी झाली आहे.