'सैराट' सारख्या चित्रपटांमुळे बलात्काराच्या प्रमाणात वाढ - भाजपा आमदार

By Admin | Updated: July 19, 2016 20:40 IST2016-07-19T20:40:08+5:302016-07-19T20:40:08+5:30

'सैराट'सारख्या चित्रपटांमुळे मुले बिघडत असून बलात्काराच्या घटनात वाढ होत असल्याचे अजब तर्कट भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी मांडलं आहे

Increased rapes due to films like 'Sarat' - BJP MLAs | 'सैराट' सारख्या चित्रपटांमुळे बलात्काराच्या प्रमाणात वाढ - भाजपा आमदार

'सैराट' सारख्या चित्रपटांमुळे बलात्काराच्या प्रमाणात वाढ - भाजपा आमदार

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ : 'सैराट'सारख्या चित्रपटांमुळे मुले बिघडत असून बलात्काराच्या घटनात वाढ होत असल्याचे अजब तर्कट भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी मांडलं आहे. कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर मनिषा चौधरी यांनी असे विवादास्पद विधान केले आहे. एवढेच नाहीतर, 'सैराट' सारख्या चित्रपटांवर बंदी आणावी, अशी मागणीही त्यांनी केली. 
 
मनिषा चौधरी यांनी हे वक्तव्य विधानसभा कोपर्डी बलात्कार प्रकरणाची चर्चा असतानाच केले आहे. कोपर्डीतील आरोपींना कडक शिक्षेची तजवीज करण्याऐवजी मनिषा चौधरींनी अजब विधान केले आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सौदी अरेबियात ज्याप्रमाणे शिक्षा दिली जाते, तशीच द्यावी.
 
त्यामुळे महिला-मुलींवर बलात्कार झाला की तातडीने नराधमाचे हात तोडले पाहिजेत, असंही मनिषा चौधरी म्हणाल्या. बलात्कारानंतर खटला चालेल, दोषीला शिक्षा होईल, ही प्रक्रिया मोठी आहे.
 

Web Title: Increased rapes due to films like 'Sarat' - BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.