‘चेकमेट’ दरोड्यातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Published: July 16, 2016 03:26 AM2016-07-16T03:26:55+5:302016-07-16T03:26:55+5:30

चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीवर दरोडा टाकून सुमारे ११ कोटींची रोकड लुटणाऱ्या १६ पैकी पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश

Increased police custody of accused in the 'checkmate' riot | ‘चेकमेट’ दरोड्यातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

‘चेकमेट’ दरोड्यातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Next

ठाणे : चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीवर दरोडा टाकून सुमारे ११ कोटींची रोकड लुटणाऱ्या १६ पैकी पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. आतापर्यंत १० कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
वैभव लहांमगे (२३), लक्ष्मण गोवर्धने (२१, रा. दोघेही इगतपुरी, नाशिक), हरिभाऊ वाघ (४३, रा. चिंचोळेगाव, नाशिक) आणि भास्कर उर्फ भरुण संतोष शिंदे (३६, रा. सातपूर, नाशिक) या चौघांच्या पोलीस कोठडीची मुदत १५ जुलै रोजी संपली. सर्वच आरोपींकडून आणखी रोकड मिळण्याची शक्यता असून ते पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने त्यांना १८ जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर गुरुवारी नाशिक भागातून अटक केलेल्या मीनीनाथ चव्हाण (२६, रा. माणिकखांब, नाशिक) यालाही २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे पोलिसांनी किरण साळुंखे आणि वैभव लहांमगे यांच्या घरांची गुरुवारी पुन्हा झडती घेतली. त्यात किरणकडे १६ लाख ४४ हजार तर वैभवकडे ११ लाख ५० हजारांची रोकड मिळाली.(प्रतिनिधी)

Web Title: Increased police custody of accused in the 'checkmate' riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.