पटसंख्या वाढवा!
By Admin | Updated: April 8, 2016 01:02 IST2016-04-08T01:02:59+5:302016-04-08T01:02:59+5:30
गुणवत्तेचे व भौतिक सुविधांचे कारण देत दर वर्षी जिल्हा परिषद शाळांतून कमी होणारी विद्यार्थिसंख्या या वर्षी पूर्णपणे रोखून ती वाढविण्यात येणार असून, यासाठी ‘आला पाडवा-पटसंख्या वाढवा’ असा कार्यक्रम हाती

पटसंख्या वाढवा!
पुणे : गुणवत्तेचे व भौतिक सुविधांचे कारण देत दर वर्षी जिल्हा परिषद शाळांतून कमी होणारी विद्यार्थिसंख्या या वर्षी पूर्णपणे रोखून ती वाढविण्यात येणार असून, यासाठी ‘आला पाडवा-पटसंख्या वाढवा’ असा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
८ ते १५ एप्रिल दरम्यान पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सन २0१२-१३ मध्ये २ लाख ४६ हजार ७६५ इतकी पटसंख्या होती. ती २0१३-१४ मध्ये २ लाख ३९ हजार ५३0 इतकी झाली. म्हणजे या वर्षात ७ हजार २३५ इतकी पटसंख्या कमी झाली. सन २0१४-१५ मध्ये २ लाख ३४ हजार ५६0 इतकी झाली. या वर्षात ४ हजार ९७0 इतकी पटसंख्या घटली. सन २0१५-१६ मध्ये २ लाख ३४ हजार २७0 इतकी म्हणजे या वर्षात फक्त २९0 पटसंख्या घटली. यावरून १0१३-१४ मध्ये ७ हजार २३५ इतके प्रमाण २0१५-१६ मध्ये २९0 पर्यंत कमी करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची मासिक आढावा बैैठक झाली. यात गुणवत्ता वाढीवर चर्चा करून पुढील वर्र्षात घटीचे प्रमाण शून्य करून पटसंख्यावाढ करण्याचा या वर्षी संकल्प केला आहे. सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना ‘आला पाडवा पटसंख्या वाढवा’ असे आवाहन केले असल्याचे वांजळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
> जल्हा परिषदेची एकही शाळा ‘क’ आणि ‘ड या प्रवर्गात राहणार नाही. सर्व शाळा या ‘अ’ व ‘ब’ वर्गातच असतील. हेचे पुढील काळात आमचे उद्दिष्ट राहणार असून, पालकांनी जिल्हा परिषद शाळेतच आपल्या पाल्यांना दाखल करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. मातृभाषेतच मुलांना चांगले शिक्षण मिळते यावर आमचा विश्वास आहे. पटसंख्या नक्कीच वाढलेली असेल.
> जिल्हा परिषद शाळाही गुणवत्तेत कुठे कमी नाहीत, हे पालकांना पटवून देता आले पाहिजे. यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी गुणवत्तावाढीसाठी आम्ही हे करीत आहोत, असा ठाम कार्यक्रम घेऊन त्याची जाहिरात करावी.
- कुलदीप कोंडे,
जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना