‘कर्करोगाच्या जाहिरातींचा आकार वाढवा’
By Admin | Updated: March 29, 2016 01:54 IST2016-03-29T01:54:37+5:302016-03-29T01:54:37+5:30
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक आहे. कर्करोगाला आळा घालण्यासाठी तंबाखू आणि सिगारेटच्या पाकिटावर ८५ टक्के भागात कर्करोग होण्याचा

‘कर्करोगाच्या जाहिरातींचा आकार वाढवा’
मुंबई : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक आहे. कर्करोगाला आळा घालण्यासाठी तंबाखू आणि सिगारेटच्या पाकिटावर ८५ टक्के भागात कर्करोग होण्याचा धोका असलेली जाहिरात छापण्यात यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.
कर्करुग्णांची संख्या वाढत असली तरी तंबाखू सेवनाच्या प्रमाणात घट झालेली नाही. चित्राच्या माध्यमातून दाखवल्यास त्याचा परिणाम अधिक दिसून येतो. पण, तरीही पाकिटावर जाहिराती कमी असतात, असे आयएमएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे पाकिटाच्या दोन्ही बाजूला ८५ टक्के जाहिरात करावी, यासंदर्भात आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांना
पत्र पाठवले आहे. १ एप्रिलपासून असे करण्यात यावे अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)