वीज वाढवा, वीज वाचवा!
By Admin | Updated: August 22, 2014 01:27 IST2014-08-22T01:27:24+5:302014-08-22T01:27:24+5:30
देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ऊर्जाक्षेत्रची भूमिका मोलाची ठरणार आहे. केंद्र सरकार वीज उत्पादन वाढविण्यास कटिबद्ध आहे.

वीज वाढवा, वीज वाचवा!
नरेंद्र मोदींचा मंत्र : ‘एनटीपीसी’च्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण
नागपूर : देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ऊर्जाक्षेत्रची भूमिका मोलाची ठरणार आहे. केंद्र सरकार वीज उत्पादन वाढविण्यास कटिबद्ध आहे. जनतेनेही वीज बचतीसाठी पुढाकार घ्यायला हवा, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वीज वाढवा, वीज वाचवा,’ असा मंत्र दिला.
नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) 1 हजार मेगाव्ॉट वीजनिर्मिती प्रकल्पाचे राष्ट्रार्पण गुरुवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाल़े त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार कृपाल तुमाने, एनटीपीसीचे मुख्य प्रबंध संचालक डॉ. अरुण रॉय चौधरी, ऊर्जा मंत्रलयाचे अप्पर सचिव देवेंद्र चौधरी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास विजेच्या माध्यमातून होऊ शकतो. ग्रामीण भागात विजेच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
च्नितीन गडकरी यांनी एनटीपीसीच्या या प्रकल्पामुळे नागपूर देशात ऊर्जाकेंद्र बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच वीजनिर्मितीमुळे या परिसराचा विकास होऊन उद्योग येतील. परिणामी, रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
च्यासोबतच नागपूर विभागातील शाळांमध्ये विद्याथ्र्यासाठी 1क्क्क् शौचालये बांधण्यासाठी एनटीपीसी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. मराठीतून भाषणाला सुरुवात करीत पंतप्रधान मोदींनी नागपूरचा गौरव केला.
शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करणार
नितीन गडकरी यांनी एनटीपीसीच्या या प्रकल्पामुळे देशात झपाटय़ाने शहरीकरण होत आहे. हे संकट मानायचे, आव्हान मानायचे की एक संधी मानायची, हे ठरविले पाहिजे. आजवर शहरीकरण हे एक संकट मानले जात होते. यापूर्वी देशात विकासाचे नियोजन झाले नाही. वाढती लोकसंख्या, वाहतूक, नागरी सुविधांचा विचार केला गेला नाही. आता मात्र शहरीकरण ही एक संधी मानून शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होत़े मोदी म्हणाले, बदलत्या काळात पर्यावरण संवर्धन ही नैतिक जबाबदारी आहे. लोकसंख्या वाढली की वाहने वाढतात. वाहतुकीची समस्या निर्माण होते. प्रदूषणात वाढ होते. त्यासाठी एकाच वेळी हजारो लोकांना प्रवास करता यावा, म्हणून मोठय़ा शहरांमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारले जात असल्याचे ते म्हणाल़े