मुंबई विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ!

By Admin | Updated: May 29, 2014 00:00 IST2014-05-28T21:49:17+5:302014-05-29T00:00:20+5:30

शैक्षणिक वर्षे २०१३-१४ मध्ये मुंबई विद्यापीठात तब्बल २२७ परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे.

Increase in number of foreign students of Mumbai University! | मुंबई विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ!

मुंबई विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ!

मुंबई : शैक्षणिक वर्षे २०१३-१४ मध्ये मुंबई विद्यापीठात तब्बल २२७ परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या ७३० संलग्नित महाविद्यालयातून जवळपास सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक वर्षे २०१३-१४ ची आकडेवारी लक्षात घेतली असता सर्वाधिक म्हणजे २२७ परदेशी विद्यार्थी या शैक्षणिक वर्षांत मुंबई विद्यापीठात दाखल झाले आहेत. सर्वात कमी म्हणजे ४७ विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०१०-११ साली दाखल झाले होते.
मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यास येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने नायजेरिया, सऊदी अरब, अफगाणिस्तान, इराण, इजिप्त, ऑस्टे्रलिया, युके, कोरिया, मॉरिशस आणि चीनमधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत हे विद्यार्थी शिकत आहेत.
गेल्या वर्षीपासून परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी शिष्यवृत्ती योजना तसेच प्रत्येक महाविद्यालयाने आता परदेशी विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
...............
शैक्षणिक वर्षपरदेशी विद्यार्थी
२००७ ८०
२००७-०८६१
२००८-०९८०
२००९-१०९८
२०१०-११४७
२०११-१२८१
२०१२-१३२०९
२०१३-१४२२७
...............

 

Web Title: Increase in number of foreign students of Mumbai University!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.