घर खरेदी महागणार, रेडी रेकनरच्या दरात वाढ
By Admin | Updated: April 1, 2017 21:30 IST2017-04-01T21:27:20+5:302017-04-01T21:30:52+5:30
घरांच्या किंमती अजूनही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असल्याने गृहबांधणी क्षेत्रामध्ये मंदी आहे.

घर खरेदी महागणार, रेडी रेकनरच्या दरात वाढ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - घरांच्या किंमती अजूनही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असल्याने गृहबांधणी क्षेत्रामध्ये मंदी आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर विकासकांनी वेगवेगळया योजना आणूनही ग्राहकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नव्हता. गृहबांधणी व्यवसायाची ही स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5.86 टक्के वाढ केली आहे.
आतापर्यंतची ही सर्वात कमी दरवाढ असल्याचा दावा सरकारने केला आहे. मुंबईत रेडी रेकनरच्या दरात 3.95%, पुण्यात 3.64% आणि ठाण्यात 3.18% वाढ केली. अहमदनगरमध्ये रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक 9.82 टक्के तर, नाशिकमध्ये 9.35 टक्के वाढ केली आहे. रेडी रेकनराच्या दरात वाढ झाल्यानंतर घराच्या किंमतीही महागतात. ज्याचा फटका ग्राहकांना बसतो.