गारपीटग्रस्तांच्या मदतीत वाढ
By Admin | Updated: February 4, 2015 02:02 IST2015-02-04T02:02:10+5:302015-02-04T02:02:10+5:30
राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

गारपीटग्रस्तांच्या मदतीत वाढ
मुंबई : राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कुटुंबातील कर्ता असल्यास त्याच्या वारसांना अडीच लाख तर इतर व्यक्तींच्या कुटुंबियांना दीड लाख रूपयांची मदत देण्यात येईल. आजवर ही रक्कम एक लाख होती. मृत जनावरांच्या पशूपालकांना प्रती जनावर २५ हजार रूपये, दोन मध्यम जनावरांसाठी प्रत्येकी १० हजार रूपये, दोन लहान जनावरांसाठी प्रत्येकी पाच हजार रूपये आणि चार लहान जनावरांसाठी प्रत्येकी साडेतीन हजार रूपये या प्रमाणात मदत देण्यात येणार आहे. पूर्णत: उद्ध्वस्त झालेल्या पक्क्या घरासाठी ७० हजार रूपये, पूर्णत: उद्ध्वस्त कच्च्या घरासाठी २५ हजार रूपये, अंशत: (किमान १५ टक्के नुकसान)उद्ध्वस्त घरांसाठी १५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीसाठी कोरडवाहू शेतीपिकांसाठी १० हजार रूपये प्रति हेक्टर, आश्वासित सिंचन क्षेत्राखालील पिकांसाठी १५ हजार रूपये हेक्टरी, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रूपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार आहे.
तसेच शेतजमिनीच्या नुकसानीसाठी खरडून गेलेल्या जमिनीसाठी २० हजार रूपये प्रति हेक्टर, वाहून गेलेल्या जमिनीसाठी २५ हजार रूपये २५ हजार रूपये मदत देण्यात येईल. शेतीपिके, फळपिके आणि शेतजमिनीच्या नुकसानी भरपाईची मर्यादा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत राहील. या मदतीशिवाय शेतकऱ्यांना जमीन महसूलात सवलत, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, कर्जावरील व्याज तीन महिन्यांसाठी माफ, तिमाही वीज बिलात प्रशासकीय विभागाने निश्चित केलेल्या कालावधीसाठी माफी, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय शासनाने आधीच घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)
च्पिकांच्या नुकसानीसाठी कोरडवाहू शेतीपिकांसाठी १० हजार रूपये प्रति हेक्टर, आश्वासित सिंचन क्षेत्राखालील पिकांसाठी१५ हजार रूपये हेक्टरी, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रूपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार आहे. उद्ध्वस्त घरांसाठी १५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे.
मदतीचा प्रकारआधीची नवीन मदत
मदत(आकडे रु.मध्ये)
मृत व्यक्ती घरातील कर्ता असेल तर१ लाख२.५० लाख
इतर व्यक्ती१ लाख१.५० लाख
पूर्णत: उद्ध्वस्त घरे५० हजार७० हजार
दोन लहान जनावरे दगावल्यास (प्रत्येकी)२५००५०००
चार लहान जनावरे दगावल्यास (प्रत्येकी)२५००३५००