अभियांत्रिकीचे शुल्क १0 टक्क्यांनी वाढवा

By Admin | Updated: April 8, 2015 02:15 IST2015-04-08T02:15:29+5:302015-04-08T02:15:29+5:30

महाविद्यालयांतील पायाभूत सेवा सुविधांचा खर्च वाढल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांना सुमारे १0 टक्कयांपर्यंत शुल्कवाढ मिळावी, अशी

Increase engineering costs by 10 percent | अभियांत्रिकीचे शुल्क १0 टक्क्यांनी वाढवा

अभियांत्रिकीचे शुल्क १0 टक्क्यांनी वाढवा

मुंबई : महाविद्यालयांतील पायाभूत सेवा सुविधांचा खर्च वाढल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांना सुमारे १0 टक्कयांपर्यंत शुल्कवाढ मिळावी, अशी एकमुखी मागणी मंगळवारी संस्थाचालकांनी शिक्षण शुल्क समितीच्या खुल्या सुनावणीत केली. समितीने संस्थाचालकांची मागणी स्विकारल्यास अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी पालकांना आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. या सुनावणीला संस्थाचालकांना समितीने निमंत्रित केले. मात्र, विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांना निमंत्रण न पाठविल्याने पुन्हा सुनावणी आयोजित करण्याची मागणी मुक्ता शिक्षक संघटनेने केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क निश्चित करण्यासाठी शिक्षण शुल्क समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत मंगळवारी वांद्रे येथील चेतना महाविद्यालयामध्ये खुली सुनावणी आयोजित केली होती. यामध्ये अनेक संस्थाचालकांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रवेश शुल्क सुमारे १0 टक्कयांपर्यंत वाढविण्याची मागणी काही संस्थाचालकांनी केली आहे.
समितीने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संस्थाचालकांसह विविध संघटनांना सुनावणीसाठी आमंत्रित केले होते. मात्र, शुल्क भरणारे पालक, विद्यार्थी आणि त्यांचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या विद्यार्थी संघटनांना समितीने बैठकीबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. तर शिक्षक संघटनांनाही बैठकीपासून दूर ठेवल्याने मुक्ता संघटनेने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Increase engineering costs by 10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.