‘बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत वाढवा’
By Admin | Updated: October 10, 2014 05:51 IST2014-10-10T05:51:30+5:302014-10-10T05:51:30+5:30
राज्यातील शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विधानसभा निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. यामुळे बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने ही मुदत वाढवून देण्यात यावी,

‘बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत वाढवा’
मुंबई : राज्यातील शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विधानसभा निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. यामुळे बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने ही मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केली आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०१५मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुुरू आहे. मात्र राज्यातील शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपिकांना विधानसभा निवडणुकीचे काम देण्यात आले असून, सध्या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येत आहे. बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची १३ आॅक्टोबर ही अंतिम मुदत आहे. मात्र निवडणूक कामामुळे शाळांना हे अर्ज भरणे शक्य होणार नसल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून करण्यात येत होती.
शिक्षक - मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण मंडळाकडे निवेदनाद्वारे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली
आहे. (प्रतिनिधी)