फसवणूकप्रकरणातील आरोपीच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: June 22, 2014 00:03 IST2014-06-22T00:03:21+5:302014-06-22T00:03:21+5:30
एका व्यावसायिकासह अन्य लोकांची 6 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत 25 जूनर्पयत न्यायालयाने वाढ केली आहे.

फसवणूकप्रकरणातील आरोपीच्या कोठडीत वाढ
>पुणो : गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकासह अन्य लोकांची 6 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत 25 जूनर्पयत न्यायालयाने वाढ केली आहे.
प्रसाद प्रभाकर वाळवेकर (रा. धनकवडी) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आशुतोष सदाशिव कुलकर्णी (वय 42, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी वाळवेकर याच्यासह मनोहर पिराजी मंडपाळे (रा. साऊथ शिवाजीनगर, सांगली) शरद व्यंकटेश कुलकर्णी आणि प्रमोद बाळकृष्ण चव्हाण (दोघेही रा. जयसिंगपूर, कोल्हापूर) हे साई एक्स्पोर्ट या कंपनीचे भागीदार आहेत. त्यांनी दुबई येथे फळे आणि भाजीपाला निर्यातीची मोठी ऑर्डर मिळाली असून, त्यासाठी भांडवलाची गरज असल्याचे फिर्यादीस सांगून त्यांच्याकडून 86 लाख रुपये दरमहा 7 टक्के व्याजदराने घेतले.
तसेच, अन्य लोकांकडूनही अशाच प्रकारे एकूण 6 कोटी 78 लाख रुपये घेतले. परंतु, त्यानंतर मूळ रक्कम अथवा व्याजाचे पैसेही न देता फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचे पैसे हस्तगत करण्यासाठी आणि उर्वरित आरोपींच्या तपासासाठी अटक आरोपीच्या पोलीस कोठडीची सरकारी वकील अनंत चौधरी यांनी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. (प्रतिनिधी)