आरोपींच्या कोठडीत वाढ

By Admin | Updated: August 20, 2015 00:28 IST2015-08-20T00:28:06+5:302015-08-20T00:28:06+5:30

तालुक्यातील ढेबेवाडी येथील खून प्रकरणातील १८ आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याचे आदेश गंगाखेडच्या न्यायालयाने दिले आहेत

Increase in the custody of the accused | आरोपींच्या कोठडीत वाढ

आरोपींच्या कोठडीत वाढ

गंगाखेड : तालुक्यातील ढेबेवाडी येथील खून प्रकरणातील १८ आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याचे आदेश गंगाखेडच्या न्यायालयाने दिले आहेत.
ढेबेवाडी येथील गणेश मारोती फड यांचा फेब्रुवारी महिन्यात खून झाला होता. या प्रकरणातील १८ आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी १४ आॅगस्ट रोजी पहाटे एकाच वेळी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजय हिबारे, फौजदार व्ही. एस. कांगणे यांच्याकडे असून, अटकेतील सर्व आरोपींना शुक्रवारी गंगाखेड न्यायालयाने १८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी मोठा पोलिस बंदोबस्तात आरोपींना परत न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

Web Title: Increase in the custody of the accused