प्रशासनाची विश्वासार्हता वाढवा
By Admin | Updated: April 22, 2015 03:57 IST2015-04-22T03:57:12+5:302015-04-22T03:57:12+5:30
प्रशासनामध्ये चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार तर वाईट काम करणाऱ्यांचा तिरस्कार होईल, असे सांगत प्रशासनाची विश्वासार्हता वाढवून जनतेच्या

प्रशासनाची विश्वासार्हता वाढवा
मुंबई : प्रशासनामध्ये चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार तर वाईट काम करणाऱ्यांचा तिरस्कार होईल, असे सांगत प्रशासनाची विश्वासार्हता वाढवून जनतेच्या मनात आदर निर्माण करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.पी.एस.मीना व मुख्य पोस्ट मास्टर जनरल अशोक कुमार दास आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)