शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Badlapur Rain: बदलापूर रेल्वे स्थानकावर छप्पर नाही; प्रवाशांचे हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:51 IST

Badlapur Rain: बदलापूर रेल्वे स्थानकातील अनेक ठिकाणी शेड नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट फलाटावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांवर पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर: बदलापूररेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर सुरू असलेल्या विकासकामांचा फटका पावसाळ्यात प्रवाशांना बसत आहे. पादचारी पुलाच्या कामासाठी स्थानकातील शेड काढल्यामुळे प्रवाशांना एकतर पावसात भिजावे लागते किंवा छत्र्या सांभाळत लोकल पकडण्याची कसरत करावी लागत आहे. दोन वर्षांपासून बदलापूर स्थानकात विकासकामे सुरू आहेत. नवीन, विस्तीर्ण पादचारी पूल उभारले जात आहेत. मात्र, कामाची गती संथ असल्यामुळे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे. बदलापूर स्थानकात निम्म्या प्लॅटफॉर्मवर पत्र्याची शेड नसल्यामुळे प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी कसरत करावी लागते.

तात्पुरत्या शेडची गरज -भरपावसात प्रवाशांना छत्री घेऊन उभे राहावे लागते आणि लोकल आल्यावर छत्री बंद करून लोकलमध्ये चढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कामाची गती पाहता आता रेल्वेने ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबरची मुदत दिली आहे.-बदलापूर स्थानकात फलाट क्रमांक तीनवर पादचारी पुलाच्या पिलरचे काम सुरू  आहे. तसेच तेथे सरकते जिने बसवले जाणार आहेत. त्यामुळे स्थानकावरील पत्र्याची शेड काढण्यात आली. -पावसाळ्यात तरी तात्पुरती शेड उभारणी करणे गरजेचे आहे. प्लॅटफॉर्मवर कामे सुरू असल्यामुळे खड्डे पडले आहेत.पावसाचे पाणी साचून प्रवासी पडण्याचा धोका निर्माण झाला. 

होम प्लॅटफॉर्मची अडचणस्थानकात पादचारी पुलासाठी जो खड्डा खोदला आहे त्यातली माती स्थानकात पसरली आहे. या मातीत पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. होम प्लॅटफॉर्ममुळे बदलापूर स्थानकात आलेली लोकल ही प्रवाशांना दोन्ही बाजूला उतरण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, फलाट क्रमांक एक प्रवाशांसाठी बंद केल्याने आता होम प्लॅटफॉर्मवरच प्रवाशांना उतरावे लागते.

स्टेशन मॅनेजर काय म्हणाल्या? रेल्वे प्लॅटफॉर्मवर छत नसल्याबाबतची आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आली आहे, अशी माहिती स्टेशन मॅनेजर धनश्री गोडे यांनी दिली.

टॅग्स :badlapurबदलापूरrailwayरेल्वे