शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मोठी बातमी! उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; तब्बल 240 कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 10:30 IST

आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. जमीन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

नाशिक: काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी आयटी (Income Tax Department) आणि ईडी (Enforcement Directorate)चे धाडसत्र सुरू आहे. या धाडीदरम्यान मोठे मासे गळाला लागले आहेत. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी छापे सुरू आहेत. आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले असून, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात आयकर विभागाने तब्बल 31 ठिकाणी छापेमारी केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. यात 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिन्यांचाही समावेश आहे. इतकी अफाट संपत्ती जमवली कशी आणि आतापर्यंत याकडे कुणाचेही लक्ष कसे गेले नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.

175 अधिकाऱ्यांची एकाचवेळी धाडजमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने छापेमारीत जप्त केलेलं कोट्यवधींचं घबाड मोजण्यासाठी तब्बल 12 तास लागले आहेत. छाप्यात सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी 22 गाड्यांमधून 175 अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले होते. त्यांच्यासोबत तगडा पोलीस बंदोबस्तही होता. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडNashikनाशिकDhuleधुळेnandurbar-pcनंदुरबार