शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Income Tax Raid BBC : 55 तासांनंतर आयकर विभागाचे पथक BBC मुंबईच्या कार्यालयातून बाहेर, कागदपत्रे-पेन ड्राइव्ह जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 21:41 IST

Income Tax Raid BBC: 14 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने बीबीसीच्या मुंबई आणि दिल्ली कार्यालयात धडक दिली.

Income Tax Raid BBC: 14 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाचे (Income Tax Department) पथक बीबीसीच्या (BBC) मुंबई आणि दिल्ली कार्यालयात पोहोचले होते. आता 55 तासांनंतर आयकर विभागाचे सर्वेक्षण संपले असून, मुंबईतील कलिना येथील बीबीसी कार्यालयून अधिकारी बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने बीबीसी कार्यालयातून अनेक कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आणि हार्ड ड्राइव्ह जप्त केले आहेत.

आयकर विभागाचे एक पथक बॅलार्ड इस्टेट येथील सिंधिया हाऊस येथील मुख्यालयाकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील कार्यालयांमध्ये अद्याप सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभाग बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांची पाहणी करत आहे. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अचानक आयटी विभागाची टीम सर्वेक्षणासाठी बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात पोहोचली होती.

10 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणीबीबीसीकडून गेल्या 10 वर्षातील आर्थिक व्यवहारांची मागणी केली जात आहे. काही संगणक आणि फोनचे क्लोन (डंप) केले गेले आहेत, ज्यात परदेशी निधी आणि हस्तांतरणाची चौकशी केली जात आहे. परदेशात केलेल्या काही आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची छाननीही केली जात आहे. आयटी कर्मचारी शिफ्टमध्ये काम करत आहेत. कर्मचार्‍यांना त्यांच्या मोबाईलमधून कोणताही डेटा हटवू नका असे सांगण्यात आले आहे.

पाहणीदरम्यान कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आलेआयकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर तेथील कर्मचारीही चक्रावले. यादरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या काही कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले होते. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेराव घालण्यास सुरुवात केला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. मोदी सरकारचे हे सूडाचे कृत्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे. 

SC मध्ये याचिका दाखलबीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांच्या आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. समाजसेवक मुकेश कुमार यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला प्रेस स्वातंत्र्याचा हवाला देत योग्य आदेश जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत बीबीसीच्या कथित वादग्रस्त माहितीपटावरील बंदी हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडMumbaiमुंबई