खामगावात आयकर विभागाची धाड
By Admin | Updated: March 16, 2017 03:22 IST2017-03-16T03:22:48+5:302017-03-16T03:22:48+5:30
खामगावातील तीन प्रतिष्ठानची पाहणी.

खामगावात आयकर विभागाची धाड
खामगाव, दि. १५- येथील प्रतिष्ठित एका व्यापार्याच्या शहरातील तीन प्रतिष्ठानांची खामगाव आणि अकोला येथील आयकर विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी सकाळी ११ वा. भेट देऊन पाहणी केली. शहरातील मेन रोडवरील एका कापड दुकानासह वाईन शॉप आणि सेल्स अँन्ड सर्व्हिसेस अशा प्रतिष्ठानांची पाहणी करण्यात आली. या पथकात येथील आयकर अधिकारी रूपा धांडे यांचाही समावेश आहे. सकाळपासून ते दुपारी उशिरापर्यंत तिन्ही प्रतिष्ठानांमधील सर्व कागदपत्रांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू होती. याबाबत आयकर विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी रेग्युलर सर्व्हे असल्याचे सांगितले. तर नोटाबंदीनंतर आयकर विभागाकडून शहरात ठिकठिकाणी छापे मारून चौकशी करण्यात येत आहे.
नोटाबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात १ हजार व ५00 च्या नोटा बँकेत भरणार्यांची चौकशी आयकर विभागाकडून केली जात असल्याची चर्चा व्यापारी वर्गात आहे.