डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाचा छापा

By Admin | Updated: July 27, 2016 11:47 IST2016-07-27T10:58:48+5:302016-07-27T11:47:52+5:30

डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. पिंपरी, कोल्हापूरच्या कॉलेजवर हा छापा टाकण्यात आला आहे

Income Tax Department's Print on DY Patil Educational Institution | डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाचा छापा

डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाचा छापा

>ऑनलाइन लोकमत - 
पिंपरी, दि. 27 - डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. पिंपरी आणि कोल्हापूरच्या शैक्षणिक संस्थेवर हा छापा टाकण्यात आला आहे. पिंपरीत सकाळी 7.30 वाजल्यापासून आयकर विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 22 अधिकाऱ्यांनी डी वाय पाटील संस्थेच्या मेडिकल, डेन्टिस्ट, फार्मसी तसंच इंजिनीअरिंग अशा विविध कार्यालयांवर छापा टाकला आहे. यावेळी त्यांच्यासोबत 20 पोलिसही उपस्थित आहेत. आयकर विभागाचे अधिकारी साडेतीन तासांपासून कागदपत्रांचा कसून तपास करत आहेत.
 
कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. अधिकारी 8.30 वाजल्यापासून ही कारवाई करत आहेत. कार्यालयातील कर्मचा-यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. छापा टाकण्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. 
 
 

Web Title: Income Tax Department's Print on DY Patil Educational Institution