‘बीएचआर’कडून आयकर कायद्याचे उल्लंघन

By Admin | Updated: February 10, 2015 02:20 IST2015-02-10T02:20:44+5:302015-02-10T02:20:44+5:30

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट पतसंस्थेत कर्ज प्रक्रिया तसेच अन्य कामकाजा दरम्यान आयकर कायद्याचे उल्लंघन

Income Tax Act violation from 'BHR' | ‘बीएचआर’कडून आयकर कायद्याचे उल्लंघन

‘बीएचआर’कडून आयकर कायद्याचे उल्लंघन

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट पतसंस्थेत कर्ज प्रक्रिया तसेच अन्य कामकाजा दरम्यान आयकर कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका लेखापरीक्षणात ठेवण्यात आला आहे. यासह खातेदारांची ओळख निश्चितीसाठी राबविण्यात येणाऱ्या केवायसी निकषांचीदेखील पूर्तता झाली नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
बीएचआर पतसंस्थेत आयकर कायदा १९६१मधील विविध कलमांतर्गत उल्लंघन झाले असल्याने जबाबदार संस्था व व्यक्तीवर आयकर विभागामार्फत कारवाई आवश्यक असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे.
केवायसीची अंमलबजावणी नाही
ग्राहकाची/खातेदाराची ओळख निश्चित करण्याबाबत केवायसी या संकल्पनेची पतसंस्थेने अंमलबजावणी केली नाही. खात्यामधील व्यवहारावर, निधीच्या प्रवाहावर देखरेख ठेवण्यात आलेली नाही. उच्चतम जोखीम असलेल्या खात्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवून अशी खाती उघडण्यास संस्था व्यवस्थापनाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केल्याचाही ठपका ठेवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Income Tax Act violation from 'BHR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.