शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 18:30 IST

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) काल  केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील १५ जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं अशक्य असल्याची भूमिका सत्ताधाऱ्यांकडून मांडली जात आहे. तसंच ही मागणी करणाऱ्या जरांगेंनी याबाबत महाविकास आघाडीकडून लेखी आश्वासन घ्यावं, असंही सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून जरांगे यांना सांगितलं जात आहे. अशातच  राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) काल  केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील १५ जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे. या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत हा निर्णय घेताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं होतं का, असा खोचक प्रश्न विचारला आहे.

सरकारवर हल्लाबोल करताना मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे की, "ओबीसींचे येवल्याचे नेते आता कुठे गेले? मराठ्यांच्या बाबतीत सरकारचे डोळे गेले आहेत, आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत? आता या जातींना ओबीसीमध्ये घ्यायला विरोध का नाही?" असा सवाल जरांगे यांनी सत्ताधारी महायुतीला विचारला आहे.

कोणत्या जातींचा ओबीसीमध्ये समावेश होणार?

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) काल  केंद्र सरकारकडे (i) लोध, लोढा, लोधी या ओबीसी जाती / समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे; तसेच (ii) बडगुजर, (iii) सूर्यवंशी गुजर, (iv) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर; (v) डांगरी; (vi) भोयर, पवार (vii) कापेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी जाती/समुदाय महाराष्ट्र राज्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) च्या केंद्रीय यादीत समावेश करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, मंगळवारी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याच्या ओबीसींच्या केंद्रीय यादीत वरील जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय विभागाने दिली आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणMahayutiमहायुती