डेंगीचा साथीच्या आजारात होणार समावेश
By Admin | Updated: July 4, 2016 01:08 IST2016-07-04T01:08:49+5:302016-07-04T01:08:49+5:30
डेंगी हा आजार साथीचा आजार असल्याचे केंद्र सरकारने नुकत्याच काढलेल्या एका अध्यादेशावरून स्पष्ट झाले आहे.

डेंगीचा साथीच्या आजारात होणार समावेश
पुणे : डेंगी हा आजार साथीचा आजार असल्याचे केंद्र सरकारने नुकत्याच काढलेल्या एका अध्यादेशावरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यातच डेंगीला साथीच्या आजाराची मान्यता देण्यात आली होती.
आजाराच्या संशयाचे रुग्ण सापडल्यास डॉक्टरांनी त्वरित
संबंधित यंत्रणेला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या आजारावर अद्याप कोणतेही अधिकृत औषध आणि लस उपलब्ध नसल्याने प्रतिबंध हा या आजारावरील एकमेव उपाय असल्याचे
या अध्यादेशात नमूद करण्यात
आले आहे.
हा आजार होत असलेला भाग, त्याची लक्षणे याबाबतची सविस्तर माहिती असावी, यासाठी सर्व पातळ््यावर या आजाराच्या रुग्णांची योग्य ती नोंद ठेवणे आणि ही नोंद शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचविणे अत्यावश्यक असल्याचे यामध्ये सांगितले आहे. त्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव रोखणे, रुग्णांची संख्या आटोक्यात आणणे, योग्य ती खबरदारी घेणे शक्य होणार आहे. अशाप्रकारे या आजाराचे लवकर निदान झाल्यास शासकीय स्तरावर सर्व गोष्टींची नोंद ठेवणे सोपे होणार आहे. याबाबतच्या सूचना राज्य सरकार, महापालिका, जिल्हा शासकीय रुग्णालये यांना देण्यात आल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या आजाराचा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याचे प्रमुख कारण
म्हणजे आपल्याकडे खासगी आणि शासकीय स्तरावरही आजाराचे
योग्य पद्धतीने नियोजन न करणे. आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्णाची नोंद झाल्यास तो पसरू
नयेत यासाठी प्रयत्न करता येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरने आपल्याकडे येणाऱ्या डेंगीच्या रुग्णाची नोंद योग्य पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे.
(प्रतिनिधी)
१९५० पासून देशात हा आजार असल्याची नोंद असताना आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, चंदीगड, दिल्ली आणि पॉँडीचेरी याठिकाणी २०१० नंतर डेंगी साथीचा आजार म्हणून टप्प्याटप्प्याने घोषित झाला; मात्र आता संपूर्ण देशातच हा आजार साथीचा म्हणून घोषित करण्यात आला आहे.