दिल्लीतील घटना काळिमा फासणारी - मुख्यमंत्री
By Admin | Updated: July 25, 2014 01:47 IST2014-07-25T01:47:00+5:302014-07-25T01:47:00+5:30
सत्तेवर आलेल्यांची प्रकृती हुकूमशाहीकडे जाणारी दिसत़े बळजबरीने कोणी उपवास सोडायला लावत असेल तर हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे,

दिल्लीतील घटना काळिमा फासणारी - मुख्यमंत्री
पुणो : सत्तेवर आलेल्यांची प्रकृती हुकूमशाहीकडे जाणारी दिसत़े बळजबरीने कोणी उपवास सोडायला लावत असेल तर हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात केलेल्या कृत्याचा निषेध केला़
महाराष्ट्र सदनात झालेला
प्रकार अतिशय निंदनीय आह़े तेथील कॅटरिंगचे काँट्रॅक्ट घेण्यास कोणी
तयार नव्हत़े शेवटी रेल्वे मंत्रलयाला विनंती केली़ तेथील जेवणाच्या दर्जाबाबत विशेषत: महाराष्ट्रीय जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी
आहेत़ त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे येथे
आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले.
पण खरी कुरबुर सुरू झाली, ती नवे खासदार आल्यावऱ या खासदारांना जागा देण्याची व्यवस्था संसदीय कार्य मंत्रलय ठरवित़े महाराष्ट्र सदनात 21 खासदारांना जागा देण्यात आली आह़े त्यात काही उत्तर प्रदेशातील आहेत़
तेथील कक्ष हे वेगवेगळ्या आकाराचे असल्याने प्रत्येकाला समसमान कक्ष देणो शक्य नाही़ त्यातून कुरबुर सुरू झाली, असे
सांगून मुख्यमंत्री म्हणाले, रेल्वेच्या कॅटरिंग विभागातील कर्मचा:याबाबत ही घटना घडली़ धार्मिक सण, परंपरा पाळल्या जातात़ त्यांचा उपवास बळजबरीने सोडायला लावल्याचे चित्रीकरण सर्वानी पाहिले आह़े त्याची आता चौकशी होईल़
दिल्ली पोलिसांना त्याची माहिती दिली आह़े सर्व धर्माबाबत महाराष्ट्राची सहिष्णुतेची परंपरा आह़े या घटनेने तिला डाग लागला
आह़े
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीच्या बैठकीत धर्मनिरपेक्ष ताकद एकत्रितपणो लढली पाहिजे या विचाराने बोलणी सुरू झाली आह़े, असे सांगून चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडताना काही ठिकाणी अपवाद झाल़े ग्राऊंड लेव्हलवर काही अडचणी येतात़ समन्वय समितीच्या बैठकीत त्याची चर्चा होत़े आघाडी करताना मागे एकत्र ताकद हा दृष्टिकोन राहिला होता़ यंदाही तो राहील़ कार्यकत्र्याच्या भवितव्यावरच पक्ष अवलंबून असतो़ त्यामुळे त्यांच्या भावना जाणून घेत आहोत़
च्नारायण राणो यांच्या राजीनाम्यावर ते म्हणाले, ही प्रक्रिया आह़े सुरुवातीला त्यांनी राजीनामा दिला होता़ आता दुस:यांदा राजीनामा दिला आह़े त्यांच्याशी बोलणो झाले आह़े लवकरच निर्णय होईल़
च्धनगर समाजाच्या आरक्षणाविषयीच्या आंदोलनाविषयी ते म्हणाले, त्यांच्या शिष्टमंडळाशी दोन-तीन ठिकाणी चर्चा झाली़ त्यातून मार्ग निघाला नाही़ धनगर समाजाविषयी आम्ही सकारात्मक आहोत़ पुणो पोलिसांनी केलेल्या प्लँचेटविषयाची माहिती घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल़े