शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात हे चाललंय काय?; चार दिवसात जळीतकांडाच्या तीन घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 11:42 IST

चोवीस वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशा दोन घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.

मुंबई : प्राध्यापिकेला पेटविल्याच्या हिंगणघाट येथील घटनेने समाजमन सुन्न असताना तशाच आणखी दोन घटना समोर आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात अंधारी येथे एकाने घरात घुसून महिलेला पेटवून दिले, तर बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने २६ वर्षीय महिलेच्या अंगावर आरोपीने ज्लवनशील द्रव्य ओतल्याची घटना मुंबईजवळील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

चोवीस वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशा दोन घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रविवारी रात्री अंधारी येथे महिला घरी एकटी असताना संतोष मोहिते नावाचा व्यक्ती घरात शिरला. महिलेने त्याला बाहेर काढण्याचा प्रयल केला असता संतोष याने तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर आरोपीने दरवाजाची कडी लावून पोबारा केला.

महिलेने आरडाओरड केल्याने घराशेजारी राहणारी तिची मुलगी व जावई यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिला त्वरित सिल्लोड रुग्णालयात दाखल केले. नंतर औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात नेले. ही महिला ९५ टक्के जळाली असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. मंगळवारी पोलिसांनी जबाब नोंदविल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

तर बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या महिलेवर आरोपीने ज्लवनशील द्रव्य ओतल्याची घटना काश्मीर येथे शुक्रवारी घडली. पोलिसांनी आरोपीला अहमदाबाद येथून अटक केली. आरोपीने तिला रस्त्यात अडवून बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास धमकावले. तिने नकार दिल्याने आरोपीने तिच्या अंगावर ज्वालाग्रही द्रव्याने भरलेली बाटली फोडली. त्यात ती पीडिता गंभीर जखमी झाली. भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे.