लोणार पर्यटन महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
By Admin | Updated: March 3, 2017 16:19 IST2017-03-03T16:19:46+5:302017-03-03T16:19:46+5:30
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर परिसरात लोणार पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणार पर्यटन महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
ऑनलाइन लोकमत/किशोर मापारी
लोणार, दि. 3 - जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर परिसरात लोणार पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मार्च रोजी पर्यटन महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवाला देश-विदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली आहे.
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवराचे संवर्धन होण्यासाठी येथे लोणार पर्यटन महोत्सव २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ५ मार्च दरम्यान चालणा-या या महोत्सवाचे उद्घाटन कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरूवातीला मातृतीर्थ सिंदखेड राजावरून लोणारला महोत्सव ज्योत आणण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी खा.प्रतापराव जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे, नगराध्यक्ष भूषण मापारी, जि.प.अध्यक्षा अलका खंडारे, डॉ.विकास आमटे, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, आ. संजय रायमुलकर यांची उपस्थिती होती.
यावेळी, प्राची धुमाळ यांनी स्वागतगीत सादर केले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील सादर करण्यात आले. या महोत्सवाला पर्यटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.