जैन अल्पसंख्याक कल्याण केंद्राचे उद्घाटन
By Admin | Updated: September 29, 2014 07:36 IST2014-09-29T07:36:45+5:302014-09-29T07:36:45+5:30
जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या वतीने दादर येथील ज्ञान मंदिरातील जैन हेल्थ सेंटरमध्ये ‘

जैन अल्पसंख्याक कल्याण केंद्राचे उद्घाटन
मुंबई : जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या वतीने दादर येथील
ज्ञान मंदिरातील जैन हेल्थ सेंटरमध्ये ‘जैन अल्पसंख्याक कल्याण केंद्रा’ची स्थापना करण्यात आली असून हेल्पलाईनदेखील सुरू करण्यात
आली आहे. जैन आचार्य राजयशसुरी श्वारही मारासाहेब आणि पूज्य वित्राग्याश मारासाहेब यांच्या हस्ते
या केंद्राचे उद्घाटन करण्यात
आले.
जैन अल्पसंख्याक कल्याण केंद्र आणि हेल्पलाईन सुरू करण्यामागचा उद्देश जैन अल्पसंख्याकाना सरकारी योजना, संस्थांविषयी माहिती मिळावी असा आहे. पंतप्रधानांची १५ कलमी योजना, शिष्यवृत्ती, मोफत मार्गदर्शन, मल्टि सेक्टोरिअल डेव्हलपमेंट प्रोग्राम, शिका आणि कमवा, महिलांसाठीच्या योजना, यूपीएससी प्रिलिमसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, परदेशात शिका अशा विविध योजनांविषयी माहिती मिळावी, यासाठी या केंद्राची आणि हेल्पलाईनची स्थापना करण्यात आली आहे, असे अॅड. धनपाल सोलंकी जैन यांनी या कार्यक्रमाच्या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)