शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवात सुवर्णरथाचे लोकार्पण, उद्या पहिला अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 12:06 IST

कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी बाहुबली येथे ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, माताजींचे आगमन झाले आहे. दरम्यान, या महोत्सवासाठी खास तयार करण्यात आलेल्या सुवर्णरथाचे शुक्रवारी सकाळी ६.३0 वाजता लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देश्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सव सुरुखास तयार करण्यात आलेल्या सुवर्णरथाचे लोकार्पण सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील श्रावक-श्राविका उपस्थित

भरत शास्त्रीश्रवणबेळगोळ (कर्नाटक ) : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी बाहुबली येथे ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, माताजींचे आगमन झाले आहे. दरम्यान, या महोत्सवासाठी खास तयार करण्यात आलेल्या सुवर्णरथाचे शुक्रवारी सकाळी ६.३0 वाजता लोकार्पण करण्यात आले.सुवर्णरथ लोकार्पण समारंभात श्रवणबेळगोळ मठाचे प्रमुख कर्मयोगी स्वस्तिश्री जगद््गुरू चारूकीर्ती भट्टारक महास्वामी आणि पूज्य १0८ आचार्य पुष्पदंत महाराज यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी करुन या सुवर्णरथामध्ये भगवान बाहुबली आणि चोविस तीर्थंकर मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील जैन श्रावक-श्राविका अभिषेकासाठी उपस्थित आहेत.यावेळी चेन्नई येथील नातीदेवी ठोलिया, कमलकुमार जैन, निशी जैन, शुभी अभिषेक जैन, नुपूर करण जैन, मेघना नितिन जैन, शोभदेवी जैन, प्रदीप ठोलिया या कुटूंबियांकडून हा सुवर्णरथ प्रदान करण्यात आला.यावेळी भट्टारक महास्वामी म्हणाले, शेकडो वर्षांच्या या परंपरेतील आजचा दिवस हा सुवणक्षण आहे. या श्रीक्षेत्राला हा सुवर्णरथ ठोलिया कुटूंबियांकडून प्राप्त झाला आहे. महाबली (तामिळनाडू) येथील रवींद्रन हे या रथाचे शिल्पकार आहेत. यावेळी स्वस्तिश्री जगद््गुरू चारूकीर्ती भट्टारक महास्वामी यांनी सुवर्णदाते नातीदेवी ठोलिया यांना श्रविकारत्न आणि शिल्पकार रवींद्रन यांना स्थपितरत्न या उपाधीने विभूषित केले.दरम्यान, या सुवर्णरथाच्या लोकापर्णानंतर भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. मस्तकाभिषेक महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव तथा सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, आचार्य वर्धमानसागर महाराज, स्वस्तिश्री जगद््गुरू चारूकीर्ती भट्टारक महास्वामी उपस्थित होते.या महोत्सवाच्या निमित्ताने ७ फेब्रुवारीपासून भगवान आदिनाथ मंदिराच्या पंचकल्याण महोत्सवाने सोहळ्याला सुरुवात झाली होती. या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसोबत ४०० हून अधिक पिंच्छिधारी मुनी व त्यागीगण श्रवणबेळगोळ येथे सहभागी झाले आहेत.श्रवणबेळगोळ येथे आचार्य वर्धमानसागर महाराज, चंद्रप्रभूसागर, पंचकल्याणसागर, देवनंदी महाराज, पद्मनंदी महाराज व त्यांचे २० त्यागी, विशुद्धसागर महाराज व त्यांच्यासमवेत ३५ त्यागी, पुष्पदंत सागर महाराज यांच्यासमवेत १ त्यागी, याशिवाय जिनसेन महाराज, सच्छिदानंद महाराज, वासूपुज्य देवसेन महाराज, अमितसागर महाराज, आदर्शसागर महाराज, प्रसन्नश्रुषीजी महाराज, मुनीश्री चिन्मयसागर (जंगलवाले बाबा), गणिनी आर्यिका जिनमती माताजी, क्षमाश्री माताजी, विभाश्री माताजी येथे उपस्थित आहे.

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरSangliसांगली